सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- सबका साथ सबका विकास “ या मुल मंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. तालुक्यातील नगरधन येथील दुर्गादेवी चौकात आज भाजपा पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रमुख काँग्रेस चे दिग्गज नेते नगरधन जिल्हा परिषद सर्कल चे माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचासोबत अनेक सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य सह काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर विश्र्वास व्यक्त करत पक्षप्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरधन क्षेत्राला विकासनिधीची कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याला माजी आमदार व भाजपा नेते मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधाकर कोहळे, भाजपा जिल्हाध्यक्ष ( रामटेक) आनंदराव राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष (काटोल) मनोहर कुंभारे, जिल्हा महामंत्री उदयसिंह यादव, जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, माजी सभापती नरेंद्र बंधाटे, भाजपा जिल्हा सचिव अनिल कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे, माजी पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, सरपंच माया दमाहे, भाजपा रामटेक मंडळ अध्यक्ष योगेश मात्रे, कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग, नगरधन शाखा अध्यक्ष संजय अजबैले, उमेश पटले, धर्मेंद्र शुक्ला, नंदकिशोर कोहळे, रणवीर यादव, ज्योती कोल्हेपरा, दीपक मोहड, सदाराम गाथे, सागर लोंढे, विजय हारोडे, रवी मोहनकर, विनोद दुरुबुळे, अतुल देवगडे, भास्कर राऊत, पंकज घरजाळे, सुनील गयगये, प्रेमदास सायरे सह जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
