महाराष्ट्र वेदभुमी

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विकसित कृषी संकल्प अभियान

बारा गावात शेतकर्‍यांसाठी विषेश मार्गदर्शन मोहीम

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- विकसित कृषि संकल्प अभियान - २०२५ हे राष्ट्रीय स्तरावरील तालुक्यातील १२ गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीमध्ये रामटेक येथे ४ व ५ जुन ला आत्मा, तालुका कृषी अधिकारी कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील १२ गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये दोन स्वतंत्र टीम तयार करून ही मोहीम पिपरिया, वरघाट, पवनी, हिवरा बाजार, कट्टा, बेलदा, लोहडोंगरी, भंडारबोडी, भिलेवाडा, मुसेवाडी, पटगोवरी आणि शिवनी भोंडकी या गावांमध्ये व दरम्यान देशभरात राबवले जात आहे. शेती आणि शेतकरी हा देशाच्या समृद्धीचा प्रमुख आधार आहे. आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधने केली आहेत. कृषी शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान, प्रगत बियाणे, खते इत्यादींच्या मदतीने कमी खर्चात पीक उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आपल्या शास्त्रज्ञांचे संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना हवामान बदलाचे परिणाम, मातीतील पोषक तत्त्वे, खतांचे योग्य प्रमाण यासह आय सी टी साधनाचा वापर करून स्मार्ट शेतीला प्रोत्साहन देणे, कृषीविषयक शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी, कृषी ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक, यांत्रिक शेतीचे मॉडेल सादरीकरण, शेतकरी व कृषी तज्ञामधील थेट संवाद सत्र, शेतकऱ्यांच्या नवोपक्रमांना प्रोत्साहनही ही अभियानाची वैशिष्ट्ये आहेत. तालुका कृषी अधिकारी सुनील कोरटे, माफसू कुलगुरू डॉ. नितीन पाटील, डॉ. व्ही शांती, डॉ. भिकाने संचालक विस्तार शिक्षण माफसू, डॉ. डी मानकर, डॉ. के. एस. राठोड माफसू, डॉ. एस पी लांडगे, डॉ. एन. शामूघम, डॉ. आर आय खोब्रागडे, डॉ. क्रांती खारकर, डॉ. शायनी जोय आदी अधिकारी शेतकऱ्यांना विविध तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन करत आहेत... संचालन व सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन आत्माचे राजेश दोनोडे यांनी केले... कृषी पर्यवेक्षक डी. एन. वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन केले. आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी जितेंद्र दमाहे, कृषी पर्यवेक्षक रवी राठोड, श्रीमती पपीता मेश्राम, विवेक गजभिये, कृषी सहाय्यक, लबडे, चिलगर, निनावे, राणे, वळवी, डोफे, दटके, कोकाटे, पुडके, काळे, वाघमारे, गोडसे, आदींनी सहकार्य केले...

Post a Comment

Previous Post Next Post