आरोपी शुक्लाला पालिका कर्मचारी आणि रिक्षावाल्यांनी दिला चोप
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
पनेवल, दि.२३ : पनवेल शहरात असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची माथेफिरू आरोपी शुक्ला या समाजकंटकाने विटंबना करण्याचा प्रयत्न केला... मात्र त्याच वेळी येथे उपस्थित असलेले पालिका कर्मचारी आणि रिक्षावाल्यांनी तात्काळ व्यक्तीला पकडून चांगला चोप दिला आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले... पनवेल पोलिसांनी आरोपी शुक्ला विरुद्ध कडक कारवाई
सुरू केली असून आंबेडकर अनुयायी यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे... पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, आम्ही आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल... आमचा तपास सुरू आहे... तरी सर्व जनतेला आम्ही शांतता राखण्याची विनंती करत आहोत... कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी...
