युनिफॉर्म स्टिचिंग सेंटरचे उद्घाटन; प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
अनंता म्हसकर - धाटाव रोहा -: सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्याचा एक उल्लेखनीय प्रकल्प हाती घेतला आहे... सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनने रोहा धाटाव-बारसोली (सुंदरनगर) येथे युनिफॉर्म स्टिचिंग सेंटर विकसित करून ग्रामीण भागातील गरजू महिलांना रोजगाराची नवीन संधी निर्माण केली आहे... या स्टिचिंग सेंटरच्या माध्यमातून रोहा विभागातील होतकरू महिलांना प्रशिक्षित करून त्यांना आर्थिकवृद्धी देण्यासाठी सुदर्शनकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत...
या प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यात कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या 1500 युनिफॉर्म्सची ऑर्डर कंपनीनेच दिल्याने महिलांना प्रोत्साहन व नवा आत्मविश्वास मिळाला आहे...
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनखाली महिलांमध्ये कौशल्य विकासित करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या उद्देशातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे... याअनुषंगाने युनिफॉर्म स्टिचिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना आता शासकीय, खाजगी संस्था आणि औद्योगिक विभागातील युनिफॉर्म्सची मागणी पूर्ण करता येईल...युनिफाॅर्म स्टिचींग सेंटरचे उद्घाटन सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड रोहाचे साईट हेड विवेक गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले...
"सुदर्शन व्यवस्थापन आपल्या विविध सीएसआर उपक्रमांतून रोहा विभागात सामाजिक विकास करणेसाठी कायमच कटीबद्ध राहिलेली आहे... या प्रकल्पामध्ये महिलांनी दाखवलेला सहभाग आणि समर्पण प्रेरणादायी आहे," असे मत विवेक गर्ग यांनी व्यक्त केले... तसेच सहभागी महिलांना दर्जात्मक कामासाठी मार्गदर्शनही केले...
सुदर्शनचे अधिकारी शिवदास बनकर म्हणाले की, हा प्रकल्प केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून, ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन बनला आहे... स्थानिक पातळीवर उद्योजकता वाढविणे आणि रोजगार निर्मितीसाठी सुदर्शन सीएसआर फाऊंडेशन असे अभिनव उपक्रम राबवित आहे...
यावेळी सुदर्शनने उपलब्ध करून दिलेल्या या उपक्रमासाठी उपस्थित महिलांनी सुदर्शन व्यवस्थापन, सीएसआर फौंडेशनचे विशेष आभार मानले... त्याचप्रमाणे आम्ही हा उपक्रम यशस्वी करून दाखवूच असा विश्वास कंपनी व्यवस्थापनास दिला... तसेच या रोजगारातून आम्हाला आता कुटुंबास आर्थिक हातभार देता येईल याचे आम्हाला खुप समाधान होत आहे, असे मत उपस्थित महिलांनी मत व्यक्त केले...
कार्यक्रमासाठी गणेश बांभुरकर, संतोष मोढवे, ॲड. विशाल घोरपडे, पराग फुकणे, श्याम धुसाने, रवि दिघे, महेश डेरीया, स्वाती मोहिते, समीर वाडवळ व अमर चांदणे आदी उपस्थित होते...


