सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथे 'ज्ञानगंगा घरोघरी' ह्या उपक्रमाअंतर्गत कामार्ले व परिसरातील गरीब व गरजू असलेल्या १०८ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सक्षम एज्युकेशन सोसायटी चोंढी तर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम रविवार दि. १५ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. गेले सतत ३ वर्ष सदर कार्यक्रमाचे आयोजन सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे करण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील आणि योगिता गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून सदर वह्या वाटपाचे नियोजन करण्यात आले होते...
सदर वह्या वाटप कार्यक्रम अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्त्या धनश्री कडू, रेवदंडा येथील दानशूर व्यक्तिमत्व विक्रांत बेडेकर आणि ग्रुप ग्रामपंचायत किहीम सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड यांच्या आर्थिक मदतीतून सदर कार्यक्रम पार पडला...
यावेळी पोलीस पाटील प्रदीप परशुराम पाटील, कामार्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्या प्रगती दिलीप पाटील, संतोष पाटील, भरत पाटील, संदेश शिर्के, काशिनाथ नागांवकर, मच्छिंद्र नागांवकर, अशोक नागांवकर, अरुण नागांवकर, दशरथ शिर्के, कामार्ले जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका वेदिका अवंती, अंगणवाडी सेविका सुशीला नागांवकर, भायमळा अंगणवाडी शिक्षिका अस्मिता नागांवकर, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वाती नागांवकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन - पहिल्या चित्रात :* कामार्ले गाव व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचे कार्यक्रम सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांचा सत्कार करताना ग्रामस्थ,
दुसऱ्या चित्रात : कामार्ले येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे वह्या वाटप करताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी व त्यांचे पालक,

