महाराष्ट्र वेदभुमी

वीरशैव सेवा समाज भवन येथे 'मोफत दिव्यांग शिबीर '

 

शिबीरात मिळणार कृत्रीम हात, पाय व कॅलिपर मोफत

सचिन चौरसिया  

रामटेक :-ऑईल अँड नॅचरल गॅस कंपनी (ONGC) यांच्या सीएसआर निधीतून दिव्यांगांना मोफत हात, पाय व कॅलिपर मिळणार आहे. सदर शिबीराचे आयोजन वीरशैव सेवा समाज नागपूर, भारत विकास परिषद नागपूर व दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांचे संयुक्त विद्यमाने केलेले असुन ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांगांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलेले आहे. वीरशैव सेवा समाज नागपूर, भारत विकास परिषद नागपूर व दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे द्वारे येत्या २० जुन ला सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या दिवशी येथे मोजमाप करण्यात येणार आहे. मात्र लाभार्थ्यांना शिबीरापुर्वी नोंदणी करणे आवश्यक असुन नोंदणीशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आलेले आहे. वीरशैव सेवा समाज भवन, लक्कड गंज, क्वेटा कॉलनी , टेलिफोन एक्सचेंज चौका जवळ, नागपूर येथे हे शिबीर दिनांक २० जून रोज शुक्रवार ला सकाळी ९ ते दुपारी २ वाजता दरम्यान पार पडणार आहे... दिव्यांग पूर्व नोंदणी जयंत ९१७५५५८३५६ तसेच कुलकर्णी ८७६६४५३१९२ यावर करायची असुन या शिबिरात आधुनिक कृत्रिम पाय ज्याची कमर्शियल किंमत रू ५० हजारापेक्षा जास्त असते असा पाय मोफत देण्यात येणार आहे... तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांगांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post