माजी आमदार रेड्डींनी केले यात्रेचे नेतृत्व
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक -:नुकत्याच पहेलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे २७ नागरिक मरण पावले यानंतर भारतीय सेनेने धाडसी कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबविले तेव्हा यानंतर भारतीय सेनेचे मनोबल वाढावे यासाठी( दि.३१ ) मे ला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात रामटेक मध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. बस स्थानक चौकातील शिवाजी पुतळा येथून या तिरंगा यात्रेचा प्रारंभ झाला तर शहरातील गांधी चौक येथे गांधी पुतळ्यासमोर या यात्रेचे समापन झाले यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी तथा पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान गांधी पुतळ्यासमोर मल्लिकार्जुन रेड्डी, संजय मुलमुले यांचेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तान वर कठोर टीका केली. तसेच यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी ही करण्यात आली. भारत माता की जय जय जवान जय किसान असे जयघोष ही करण्यात आले. संचालन रजत गजभिये यांनी केले. यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी जि.प. सदस्य सतीश डोंगरे, माजी जि.प. सदस्य दुधरामजी सव्वालाखे, दिलीप देशमुख, संजय मुलमुले, राजेश ठाकरे, आलोक मानकर, नंदू चंदनखेडे, राहुल किरपान, वनमाला चौरागडे, कविता मुलमुले, चित्रा धुरई, पद्मा ठेंगरे, लता कांबळे, उज्वला धमगाये, नेहा गांवडे, श्वेता गोन्नाडे, योगेश म्हात्रे, करीम मालधारी यांचेसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते...