NDA मधील १७ धाडसी महिला
पुणे: पुण्यातील खेतरपाल परेड मैदानावर, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मधून १७ महिला कॅडेट्सची पासिंग आऊट परेड अभिमानाने पार पडली... ही घोडदौड फक्त एक यश नव्हे, तर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरूष समानतेच्या दिशेने एक सशक्त पाऊल आहे...
या ऐतिहासिक बॅचमधील ९ कॅडेट्स भारतीय लष्करात (ARMY), ३ कॅडेट्स नौदलात (NAVY), आणि ५ कॅडेट्स वायूदलात (AIR FORCE) देशसेवेचे कार्य बजावणार आहेत...
या बॅचच्या धाडसी वाटचालीने अनेक मुलींच्या मनात देशसेवेचा पाया रचला, ज्याचा परिणाम पुढील बॅचवरही दिसून आला... २०२३ NDA बॅचमध्ये १२६ महिला कॅडेट्सनी प्रवेश घेतला आहे...हेच त्यांच्या धैर्याचं, निष्ठेचं आणि प्रेरणादायी प्रवासाचं ज्वलंत उदाहरण आहे!
आज या भगिनींनी ‘स्त्री कॅडेट’ म्हणून नव्हे, तर भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी कॅडेट म्हणून ‘पुढचं पाऊल’ टाकून आपल्या देशाचा अभिमान उंचावला आहे...त्यांची जिद्द,कष्ट, चिकाटी, धैर्य आणि देशसेवेच्या निष्ठेला सलाम!जय हिंद!