महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंतीचे आयोजन

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त तुकडोजी महाराज बालोद्यान रामटेक येथे ३० एप्रिल ते १ मे या कालावधीत दोन दिवसीय ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे... जयंतीनिमित्त स्त्री-पुरुष भजन समूहाने तुकडोजी महाराजांचे भजन गायले व प्रार्थना केली... १ मे रोजी सकाळी ६ वाजता सामुदायिक ध्यान, सकाळी ८ ते १० या वेळेत भजन, ह.भ.प. सकाळी १० ते ११.३० पर्यंत. पांडुरंग महाराज शेंडे अडेगाव (कोडामेंढी) यांचे गोपाळकाले यांचे कीर्तन होईल... १२ वाजता आरती व प्रसादाने सांगता होईल... कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामटेकच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post