महाराष्ट्र वेदभुमी

पवनी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर


शिबिरात ऐकून ५४३ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- महाराष्ट्र शासन, महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत पवनी मंडळ भागातील पवनी, बोथिया-पालोरा, पिपरिया, दाहोदा, व पथरई या ग्रामपंचायत अंतर्गत गावातील नागरिकांसाठी दि. २७ रोजी गोंडवाना हॉल येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये मा. श्री प्रियेशजी महाजन, उपविभागीय अधिकारी, रामटेक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले व नागरिकांशी जनसंवाद करुन मुख्य अडचणी जाणुन घेतल्या. या शिबिरामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी, उत्पन्न दाखले, शेतकरी दाखले, आधार नोंदणी, आभा कार्ड, मोफत ७/१२ वाटप, सामाजिक लाभाच्या योजना, पीएम किसान योजना, ॲग्रीस्टॅक योजना आदी महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसंबंधी मार्गदर्शन व निराकरण केले. सदर शिबीरामध्ये तालुका रामटेक अंतर्गत सर्व विभागांकडून गावातील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवून शिबीराचा एकूण ५४३ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. सदर शिबीरात मा. श्री रमेश कोळपे तहसिलदार रामटेक, श्रीमती पुनम कदम अप्पर तहसिलदार देवलपार यांचे व्यवस्थापनात सदर शिवीर यशस्वीरीत्या पार पाडले. पवनी मंडळातील श्रीमती शांताबाई कुंभरे माजी जि.प. सदस्य, श्री. संजय नेवारे माजी सभापती पं.स. रामटेक, श्री. चंद्रकांत कोडवते माजी सदस्य पं.स. रामटेक, श्रीमती छाया रोशन भटटी, सरपंच बोथीया पात्लोरा, श्री प्रविण उईके सरपंच पिपरीया, श्री स्वप्नील सयांम उपसरपंच दाहोदा तर महसुल विभागातील श्री भोजराज बडवाईक नायब तहसिलदार रामटेक, श्री भुजाडे सहाय्यक गटविकास अधिकारी रामटेक, श्री राजु लोणकर मंडळ अधिकारी, कु. शुभांगी उगे, कु. अनुजा नवनागे, श्री प्रशांत बलसुरे, श्री प्रतिक बागडे तलाठी व कार्यालयीन कर्मचारी व ईतर विभागातील अधिकारी व कर्मचारी या शिबिराकरिता उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post