महाराष्ट्र वेदभुमी

पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव ...

 


नवीमुंबई प्रतिनिधी: आदर्श पत्रकार म्हणून नवीमुंबई तसेच रायगड मधून ओळखले जाणारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव ...

  ममताबादे यांचा जन्म १७ मे १९८६ रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला असला तरीही उच्च शिक्षित असलेले तसेच अत्यंत साधेपण ,नम्रतेने वागणारे व दांडगा जनसंपर्क असेलेले तसेच उरण मधील विविध सामाजिक कार्यात सक्रिय असणारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची एक ओळख आहे...या आदर्श व्यक्तिमत्वाचे नेहमीच जतन करणारे ममताबादे यांचा काल १७ मे रोजी उरण शहरातील विमला तलाव गार्डनमध्ये मॉर्निंग ग्रुप व मित्र परिवार तर्फे गुलाबपुष्प देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या...यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसाच्या  तसेच त्यांच्या कार्यालाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत...त्याचप्रमाणे साधे आणि सरळ स्वभावाचे असणारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला आहे...हीच खरी वस्तुस्थिती त्यांच्या काळाच्या वाढदिवसा निमित्तानेही पाहायला मिळाली...

त्यांच्या लेखणीतून ते नेहमीच समाजाच्या समस्या मांडण्याचे काम तसेच त्यांना न्याय मिळण्याचा उदात्त विचार घेऊन पत्रकारितेचे काम अखंड जपत आले आहेत..पुढेही त्यांचे कार्य जोमाने सुरू रहावे यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या...

Post a Comment

Previous Post Next Post