सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : विरुद्ध दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या दोन दुचाकींची जोरदार धडक झाली... या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे... हा अपघात गुरुवार, १५ मे रोजी रात्री ९ वाजता रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मनसर -रामटेक महामार्गावरील वाहिटोला (ता. रामटेक) येथे घडला... गुरूवारच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास वाहिटोला येथिल किराणा व्यापारी विजय यशवंत वंजारी वय ४८ वर्षे राहणार वाहीटोला हा आपली दुकान बंद करून घरी जाण्याकरीता आपली मोटर सायकल डिसकवर एमएच ४० आर ७३८९ घरी जात असताना रामटेक दिशेने भरधाव वेगात येत असणारी मोटरसायकल क्रमांक एम ३१ सी यु ६२७१ या दोन्ही मोटरसायकलमध्ये समोरासमोर धडक झाल्याने मोटर सायकल चालक विशाल काशीराम वरखडे वय २६ वर्ष राहणार पाचगाव यांच्या जागी घटनास्थळीच मृत्यू झाला... तर त्याच्यासोबत असलेला अंकित बबलू कोचे हा जखमी जखमी झाला... तर दुसरा मोटर सायकल चालक विजय हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारा करिता नागपूरला नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला... सदर प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे यांच्या मार्गदर्शनात रामटेक पोलीस करीत आहे...
