अपराध करणारे दोघे सख्खेच भाऊ,
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- उधारीतल्या पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना गुरुवार रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास रामटेक-दुधाळा मार्गावरील नगर परिषदेच्या क्वार्टर मागील भागात घडली... हर्षल धनराज कोटांगडे वय २६ वर्ष राहाणार विनोबा भावे वार्ड रामटेक असे मृतकाचे नाव आहे... याप्रकरणी पोलिसांनी दुर्गेश राजकुमार इंगोले वय २८ वर्ष, स्वप्नील राजकुमार इंगोले वय २४ वर्ष अशी आरोपींची ची नावे असून यांना ताब्यात घेतले आहे. दुर्गेश इंगोले व हर्षल कोटांगडे हे दोघे मित्र होते...
प्राप्त माहितीनुसार मृतक व आरोपींमध्ये उधारीच्या पैशावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघेही आमोरासमोर आले की त्यांच्यात वाद उफाळून येत होता... काल गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मृतक व आरोपी पुन्हा आमोरासमोर आल्याने त्यांच्यात उधारीच्या पैशावरून वाद सुरू झाला... थोड्याच वेळात वाद विकोपास पोहोचला व रागाच्या भरात इंगोले बंधूंनी संगनमत करून हर्षलवर धारधार चाकूने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला... यात हर्षल गंभीर जखमी झाला होता. दरम्यान रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी हर्षलला प्रथम रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरच्या मेयो रुग्णालयात रेफर केले... मेयो रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. रामटेक पोलिसांनी आरोपी इंगोले बंधूंवर कलम १०३(१), ३(५) कलमाव्यये गुन्हा दाखल केला असून अटकेतील प्रक्रिया रात्री बऱ्याच उशिरापर्यंत सुरू होती... पुढील तपास ठाणेदार आसाराम शेटे करीत आहेत...
