रायगड :- मानवजातीच्या परमकल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फोंडा-गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी रायगड या जिल्ह्यातून सनातन संस्थेचे शेकडो साधक, हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी ‘सनातन राष्ट्रा’चा जयघोष करत वाहने, बस, रेल्वे आणि विमानातून एकूण ७०० हून अधिक जणांनी गोव्याकडे प्रयाण केले... यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या...तसेच वाहनांवर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे वातावरणात चैतन्य पसरले होते...
