रोहा प्रतिनिधी: दुग्ध व्यवसाय करण्यासाठी हिरवा चारा हा खुप महत्वाचा आहे... उन्हाळ्यामध्ये एप्रिल व मे महिन्यात हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे श्री. विवेकानंद रिसच ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा आणि पंचायत समिती रोहा (पशुविभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने लांढर येथील शेतकरी श्री. सनिल धवडेकर यांच्या शेतावर अफ्रिकन टॉल मका लागवड करण्यात आला तोच मका ६० दिवसानंतर काढून कडबाकुट्टी मध्ये कुट्टी करून मुरघास बॅग मध्ये भरुन ठेवण्यात आला, त्या बॅग ४५ दिवसा नंतर ओपन करण्यात आल्या...
एक्सेल कंपनीचे सीएसआर प्रमुख श्री . सुशिल रुळेकर व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती रोहा डॉ श्री. प्रविण धुमाळ यांच्या हस्ते मुरघास बॅगचे ओपनिंग करण्यात आले... मुरघास छान प्रकारे तयार होऊन ते गुरे आवडीने खाऊ लागली. त्यावेळी श्री रुळेकर सर यांनी शेतकऱ्यांना मुरघास प्रकल्पा संदर्भात माहिती दिली व डॉ धुमाळ सर यांनी मुरघास चे फायदे सांगून तालुक्यातील शेतकऱ्यांना गुरांसाठी मुरघास खाद्य खाण्यास द्यावे असे आव्हान केले आहे... त्यावेळी VRTI संस्थेतील पशुसंवर्धन विभागातील कु. सायली भगत यांचे विशेष सहकार्य लाभले...

