.
वृक्ष कोलमडून पडले, नदी,नाले, तुडूंब,
कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यात शनिवारी पावसाची रिमझिम सुरु असतानाच रविवारी २५ में रोजी रोहिणी नक्षत्र निघताच सायंकाळी वादळी वाऱ्यासह सह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून दुबार भातशेतीचे प्रचंड नुकसान, वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले, नदी नाले तुडूंब खरिपाची पेरणीआधीच शेतजमीन जलमय झाल्याने बळिराजा मोठा संकटात सापडला आहे...
में महिन्याच्या सुरवातीपासूनच रायगड जिल्ह्यासह तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने भात पीक, विटभट्टी व्यावसायिक, फळ बागायतदार,लग्न मंडप डेकोरेशन व्यावसायिक, तसेच दुपार भातपीक घेणारे शेतकरी मोठे संकटात सापडले. तर अवकाळी संततधार पावसाचा पिकांना मोठा फटका बसला दुबार पीक घेणारे काहीनी चिखलातून मिळेल तसे धानाची झोडणी मळणी केली तर मजुरांचा अभाव त्यात शेतात चिखल त्यामुळे आधुनिक यंत्रणा देखील कूच कामी ठरल्याने कोलाड खांब परिसरात गोवे, पूई, मुठवली,शिरवली, पुगाव, सह काहींचे मात्र अद्याप शेतातच उभे पिक राहिले आधी अवकाळी जवळपास संपूर्ण में महिन्यात अवकाळीने बळिराजा त्रस्त झाला असतानाच त्याला जोडूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा अधिक संकटात सापडला तो चिंतातुर झाला असून अवकाळी पावसामुळे फळ बागायतदार यांचे पंचनामे तातडीने झाले मात्र भातपीक घेणाऱ्या बळीराजाला पंचनामे करणाऱ्या अधिकारी वर्गाने वाऱ्यावर सोडले की काय हाच प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे...
रायगडात विविध भागात वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून शनिवारी रविवारी अनेक भागांना पावसाने झोडपल्यामुळे भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसाचा फटका दुबार भातपीक घेणाऱ्या बळीराजाला बसला आहे. सलगच्या पावसामुळे भातशेतीच्या शिवारात पाणी साचले आहे. खरिपाच्या पिकांची बळीराजाकडून मशागत सुरू असतानाच अधून मधून अवकाळी पाऊस बरसल्याने त्यांची तारांबळ उडाली होतीच मात्र त्यात अधिक मागील दोन दिवस मुसळधार पाऊस बरसल्याने खरिपाची पेरणी लांबली पेरणीअधीच शेतजमीन जलमय झाली नदी नाले तुडूंब भरल्याने बळीराजाची धास्ती वाढली असल्याने मोठे संकट डोळ्यासमोर उभे राहिले आहे. त्याचे अश्रु अनावर झाले आहेत...
आधी अवकाळी त्याला जोडूनच पावसाने तडाखा दिल्याने पिकाची माती झाली आहे. तसेच पावसाळ्यामुळे वीटभट्टीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वीटभट्टी मालकास ही मोठा अर्थिक फटका बसला आहे.रोहा चनेरा मार्गावर वृक्ष कोलमडून रस्त्यावर पडल्याने वाहतुक बंद करण्यात आली होती तद्नंतर ती सुरळीत करण्यात आली विद्युत पुरवठा देखील तालुक्यातील काही गावात रविवारी रात्रीपासून खंडित झाला असल्याचे समजले...
जिल्ह्यात रविवारी पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.अद्याप पावसाच सुरुच आहे. या पावसामुळे उन्हाळी भात शेतीसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने शेतात पिकून आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणं कठीण झालं आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाईल, या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे.मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले असतानाच आठ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं असून 25 में रोजी जिल्ह्यातील काही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर हवामान माहिती - २६-०५-२०२५ रोजी सकाळी १० वाजता जारी केलेला इशारा: पुढील ३-४ तासांत मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बाहेर पडताना खबरदारीसाठी हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते...
प्रतिक्रिया
में महिन्यात अवकाळी पावसामुळे साऱ्यांचीच धावाधाव आणि पळापळ दुबार भातपिकांचे फळबागत दार, विट भट्टी व्यावसायिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले त्यात पुन्हा पावसाने जोरदार तडाखा दिल्याने कोलाड खांब परिसरातील गोवे, मुठवली, शिरवली, पुगाव, पुई, आदी भातशेतील तयार झालेले धान पूर्णतः पाण्यात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे सदरील खात्याने लवकरात लवकर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे... महेंद्रशेठ पोटफोड सरपंच गोवे