महाराष्ट्र वेदभुमी

"स्वयं अध्ययन उपक्रमाने घडवले आत्मनिर्भर विद्यार्थी - दहावीचा उज्ज्वल निकाल "


रोहा वार्ताहर :"ज्ञानप्रबोधिनी पुणे" आणि "श्री विवेकानंद रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एक्सेल इंडस्ट्रिज लिमिटेड) रोहा"  यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या वर्षभरात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या “स्वयं अध्ययन कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळाले...

या उपक्रमामागे ज्ञानप्रबोधिनीच्या शास्त्रशुद्ध, मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाची प्रेरणा होती... प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्वतः शिकण्याची क्षमता आहे, यावर आधारित हे प्रशिक्षण त्यांना आत्मनिर्भरतेकडे घेऊन गेले... या प्रशिक्षणात रोहातील 18 शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला... सर्व विद्यार्थ्यांनी नवीन पद्धतीने अभ्यासाची सवय लावली, नियोजनपूर्वक अभ्यास केला आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे गेले...

दहावी मार्गदर्शन वर्गामध्ये सहभागी शाळांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

1. सानेगुरुजी विद्यानिकेतन, सानेगाव

2. प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय, धाटाव

3. कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक विद्यालय, तीसे पंचक्रोशी

4. को. ए. सो. माध्यमिक इंग्रजी शाळा, मेढा

5. न्यू इंग्लिश स्कूल, शेणवई

6. छत्रपती शिवाजी विद्यालय, आरेबुद्रुक

7. सर्वोदय विद्यालय, सुड्कोली

8. महात्मा गांधी विद्यामंदिर, चोरढे

9. श्री रा. ग. पोटफोडे मास्तर विद्यालय व कै. द. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय, खांब

10. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सानेगाव

11. पी. एन. पी. माध्यमिक हायस्कूल, तळाघर

12. न्यू इंग्लिश स्कूल, कोकबन

13. श्रमिक विद्यालय, चिल्हे

14. द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय, विरजोली

15. द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय, भालगाव

16. को. ए. सो. माध्यमिक विद्यालय, घोसाळे

17. न्यू इंग्लिश स्कूल, विठ्ठलवाडी – राजखलाटी

18. रामभाऊ महादेव वागळे विद्यालय, धामणसई

एकूण 422  विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. यामधून खालीलप्रमाणे यशस्वी निकाल मिळाले:

90%  पेक्षा अधिक गुण: 5 विद्यार्थी

85 % ते 90% : 21 विद्यार्थी

80 % ते 85 %: 32 विद्यार्थी

70 % ते 80 %: 87 विद्यार्थी

65 % ते 70 %: 86 विद्यार्थी

60 % ते 65 %: 77  विद्यार्थी

60 % पेक्षा कमी: 102  विद्यार्थी

एकूण 410 विद्यार्थी उत्तीर्ण झाले; प्रेरणादायी गुणवंत विद्यार्थी

 1. रुचिता मांडलेकर – 91.80%

 2. प्रांजल येळकर – 90.80% 

 3. तनिष्का पेटकर – 90.80%

 4. श्रावणी लाडगे – 90.40%

 5. प्रीतम मोरे – 90.00%

या 18 शाळांपैकी 8 शाळांनी 100%  निकाल प्राप्त केला. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.हे यश सहज मिळाले नाही तर विद्यार्थ्यांनी सातत्य, चिकाटी आणि स्व-अभ्यासाच्या शिस्तीचा अवलंब केला. यामागे ज्ञानप्रबोधिनीचे मार्गदर्शन, प्रशिक्षकांचे परिश्रम, आणि स्थानिक शाळांच्या शिक्षकांचा सक्रिय सहभाग या सर्वांचा संयुक्त परिणाम आहे...

हा उपक्रम म्हणजे केवळ निकालाचे यश नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये तयार झालेली शिकण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची सवय हे त्याचे खरे यश आहे.  यासाठी संस्थेने गेल्या ९ वर्षे सराव प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पुरवते, विज्ञान प्रयोग करण्यासाठी साहित्य पुरवते, तज्ञ् व्यक्तींचे मार्गदर्शन, दहावीला विद्यार्थी गेल्यापासून ते परीक्षेचा निकाल लागेपर्यंत पाठपुरावा केला जातो...

दहावीला पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रमुख श्री. सुशिल रुळेकर सर यांनी विशेष कौतुक केले... सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे, शाळेचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन!

Post a Comment

Previous Post Next Post