सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: हिंदू धर्माच्या लोकांसाठी शनि जयंतीच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला झाला होता... म्हणून, दरवर्षी या तारखेला शनि जयंतीचा उत्सव साजरा केला जातो, ज्याला शनि जन्मोत्सव असेही म्हणतात. रामटेक मौदा मार्गावरील इखारनगर, किट्स कॉलेजजवळ असलेल्या शनी मंदिरामध्ये २५ व २६ मे रोजी श्री शनी जयंती महोत्सवाचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे... रविवार, २५ मे रोजी सायं. ७ वाजता हरिओम बाल भजन मंडलचा कार्यक्रम होणार आहे... त्याचप्रमाणे सोमवार २६ मे रोजी सकाळी श्री गणेश, हनुमान, शिव तथा शनिमूर्ती यांचा विधिवत अभिषेक, सार्वजनिक हवन पूजन, सायंकाळी शनिदेवची महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. साय काळी ७ नंतर मधुरम सुगम संगीत होईल... तेव्हा जास्तीत जास्त भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संकट मोचन शनी देव सेवा समितीतर्फे आव्हान करण्यात आलेले आहे...