महाराष्ट्र वेदभुमी

लेखक तानाजी धरणेंच्या हेलपाटा कादंबरीला माय मराठी प्रतिष्ठान पुणे संस्थेचा २०२५ उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार..


कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील पहूर ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी तसेच लेखक तानाजी धरणे यांच्या हेलपाटा कादंबरी ला माय मराठी प्रतिष्ठान पुणे यांचे साहित्य क्षेञातिल अतिशय मानाचे समजले जाणारे यंदाचा साहित्य पुरस्कार मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला...

पञकार भवन पुणे येथे शानदार पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन माय मराठी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी लेखक तानाजी धरणे यांच्या हेलपाटा कादंबरी हा पुरस्कार लेखक, साहित्यिक कवी मिलिंद जोशी सर कार्याध्यक्ष मसाप पुणे व अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ यांच्या हस्ते लेखक तानाजी धरणे यांना प्रदान करत सन्मान करण्यात आला. तानाजी धरणे हे गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी म्हणून रोहा तालुक्यात कार्यरत असून त्यांना लेखनाची मोठी आवड असल्याने त्यांनी अनेक पुस्तकं आणि कादंबरी लिहिली आहेत याचा विचार करून या संस्थेने त्यांच्या या कार्याचा गौरव करत पुरस्कार प्रदान केला यावेली त्यांच्या पत्नी पुष्पा धरणे उपस्थित होत्या...

ज्येष्ठ लेखिका संजीवनी बोकील मॅडम, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मिलिंद जोशी सर कार्याध्यक्ष मसाप पुणे व अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ, प्रा .साईनाथ पाचारणे ज्येष्ठ साहित्यिक, सु.ल .खुटवड मुख्य उपसंचालक दै .सकाळ त्याचप्रमाणे संजय कमलेकर वनअधिकारी महाराष्ट्र शासन ,सौ.प्रतिक्षा संतोष पाचारणे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सह मान्यवर यांच्या तसेच आदी पुरस्कार सन्मानमूर्ती उपस्थित होते ...

तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर साहित्यिक कवी लेखक पञकार बांधव हजर होते... या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ साहित्यिक साईनाथ पाचारणे सर यांनी केले तर आभार माय मराठी प्रतिष्ठान संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष सुभाष पाचारणे सर यांनी केले...  सर्वाचे आदरातिथ्य बाळासाहेब खरात सर यांनी केले..अतिशय सुंदर व सुनियोजित कार्यक्रम संपन्न झाला... यावेळी प्रमुख पाहुणे  मिलिंद जोशी सरांनी एकुणच मराठी साहित्य व आजची परिस्थिती या विषयी अतिशय सुंदर प्रबोधन केले...शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा संजीवनी बोकील यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली... आदरणीय सुभाष  पाचारणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सहभोजनानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post