गावकऱ्यांचा महामार्गावर तांडव
महामार्ग क्र. ४४ दोन तास ठप्प
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू झाला... ही घटना बुधवारी (ता. ३०) सकाळी ८.४५ वाजताचा सुमारास आमडी फाटा रस्त्यावर घडली... नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील ग्रामपंचायत नयाकुंड येथील रहिवासी रमेश सुखदेव बिराताल (वय ५०) यांना मध्य प्रदेशातील बालाघाटकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने अक्षरशः चिरडून ठार केले... या धडकेनंतर अपघातस्थळी अंगावर शहारे आणणारे दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला... रमेश बिराताल हे मजुरांना पैसे देण्यासाठी मोटारसायकल (एमएच ४०-एएन ९१६८) वरून देवलापारकडे निघाले होते... मात्र आमडी परिसरात येताच भरधाव वेगातील पवन ट्रॅव्हल्स (एमपी ५०-पी ६१११) त्यांना इतक्या जोरात उडवलकी मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले... व शरीर सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत गेले... ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांचे काळीज हलले... या धक्कादायक घटनेनंतर संबंधित ट्रॅव्हल्सचा चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला... अपघातानंतर परिसरात तात्काळ संतापाची लाट उसळली... नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ पूर्णतः ठप्प केला... सुमारे दीड ते दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती... वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या... "आता पुरे झालं! रोज अपघात, रोज बळी… आम्हाला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला... रामटेक पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली... पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संबंधित ट्रॅव्हल्स वाहनाचा मार्ग काढण्यात येत आहे... पोलिसांनी काही ठिकाणी शोधमोहीम सुरू केली असून लवकरच ट्रॅव्हल्स आणि आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात असणार असल्याची माहिती समोर येत आहे... पोलिस प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत...
