श्याम लोखंडे रोहा रायगड
रायगड रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली श्री क्षेत्र तळाघर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा ६ ते ७ एप्रिल रोजी साजरा होत आहे... या यात्रेत ऐतिहासिक महादेवाचे लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पध्दतीने कार्यक्रम होतात.तर यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपपला व्यवसाय थाटतात यात्रेत कोळ्यांचे जत्तर काठयांचे आगमन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत रविवारी झाले असून या सोहळ्यासाठी भक्तांचा जनसमुदाय उसळत मोठ्या भक्तीं भावात तल्लीन होऊन श्री शंभू महादेव आणि माता पार्वती यांच्या लग्न सोहळ्याचा दर्शन घेतले.
राम नवमी दिवशी रविवारी रात्रौ बारा वाजता शंभू महादेव आणि माता पार्वती लग्न सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तळा, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा आदी तालुक्यासह विविध ठिकाणाहून तर विशेषतः ग्रामीण भागातून बहुजन समाज भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठया आनंदाचा हा सोहळा पाहण्यासाठी तसेच श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भविक या यात्रेत येतात आणि तल्लीन होत दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटतात...
हजारो कोळी बांधव यांची महादेवाचे भक्त सुतार यांची गळा भेट ऐतिहासिक समजला जाणारा हा श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा धार्मिक आणि आध्यात्मिक तथा विधिवत पद्धतीने मोठ्या भक्तीने संपन्न झाला...
महादेवाडी येथील नवरदेव , धाटाव येथील नवरी ,करवली असा देवांचा साज पारंपरिक परंपरा जोपासत ही येथील पुरोहित धाटाव, लांढर,वाशी,महादेववाडी तसेच परिसरातील जंगम ,त्याच बरोबर पंचक्रोशीतील, तळाघर, धाटाव, वाशी,किल्ला, बोरघर, लांढर, निवी, रोठ बुद्रुक, रोठ खुर्द,तसेच रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भाविक भक्तगण तसेच बहुजन समाज बहुसंख्येने उपस्थिती दर्शवित याचा लाभ घेत यात्रेचा आनंद लुटतात...
तर यात्रेत लहान मोठ्यांना आकर्षित म्हणून विविध प्रकारचे दुकानदार यांनी आपले व्यवसाय थाटले असून ,काही आनंद लुटण्यासाठी आगस् पाळणे, चक्कर, मौत का किंवा चलेगी मोटर सायकल तसेच लहान मुलांसाठी विविध जेम्स आणि खेळणी असे या जत्रेच स्वरूप असून लाखोंची उलाढाल या यात्रेतून होत असल्याचे दिसून येते.
