मुंबई: मंत्रालयात मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा सखोल आढावा घेण्यात आला...
बैठकीत राज्याचे जेष्ठ नेते मा.खा.श्री. सुनील तटकरे यांच्यासह मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या...
बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
◾ जामगाव (ता. रोहा) येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वन व उद्यान प्रकल्पासाठी निधीवाढीचा निर्णय.
◾ मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थान परिसरात रोपवे प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव.
◾ मौजे संभे गावाच्या सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनासाठी तातडीची कार्यवाही.
◾ गिरणे (ता. तळा) येथे खारभूमी संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी सकारात्मक निर्णय.
◾ दिवेआगर (ता. श्रीवर्धन) येथे मत्स्यालय व पर्यटक निवारा केंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेतून प्रस्ताव.
◾ पद्मदुर्ग किल्ल्याचा समावेश गडकोट संवर्धन योजनेत करण्याचा प्रस्ताव व पर्यटक जेट्टीसाठी पाठपुरावा.
◾ मुरुड किल्ला व राजापूरी ग्रामपंचायत परिसरातील अडचणी सोडवण्यासाठी ठोस मार्गदर्शन.
या सर्व प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्याचा पर्यटन, पर्यावरण, शिक्षण, संशोधन व लोकजीवनाचा चेहरा बदलणारा विकासाचा नवीन टप्पा सुरु होणार आहे...
स्थानिक गरजांवर आधारित विकास आणि दीर्घकालीन शाश्वत दृष्टिकोन हाच आमचा उद्देश आहे...
मा. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्पष्ट दिशा आणि तातडीच्या निर्णयक्षमतेमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती आणि दिशा लाभणार आहे...
यावेळी कृषीमंत्री मा.श्री.माणिकराव कोकाटे साहेब, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. राजगोपाल देवरा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे, नगरविकासचे अपर मुख्य सचिव श्री. असीमकुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. सोनीया सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव श्री. सौरव विजय, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्री. अतुल पाटणे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे आदींसह शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
