महाराष्ट्र वेदभुमी

हुतात्मा स्मारक येथे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:-हुतात्मा स्मारकात जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी दीप प्रज्वलीत करून जेष्ठ नागरिकांनी सुरुवात केली... जेष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते... मंडळाची सभा हुतात्मा स्मारक सभागृहात मंडळाचे उपाध्यक्ष सुखराम उचिबगले यांच्या अध्यक्षतेत पार पडली... नुकतेच निधन झालेले मंडळाचे अध्यक्ष रमेश चौकसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली... चौकसे यांच्या रिक्त जागी उपाध्यक्ष सुखराम उचिबगले यांची सर्वानुमते जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली... उपाध्यक्ष पदी हरिहर भुजाडे यांची निवड करण्यात आली... सभेत जेष्ठ नागरिक मंडळाला विरंगुळा केंद्रासाठी हुतात्मा स्मारकाची जागा व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाने राज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचे आभार मानले... सभेत जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय तरतुदी व नियमांची माहिती नायगावकर यांनी दिली... यावेळी सचिव वामन नायगावकर, सहसचिव रमाकांत कुंभलकर, कोष्याधक्ष इशरत सिंगनजुडे, मिडीया प्रमुख नत्थू घरजाळे, कार्यकारिणीचे सदस्य विजय खंडार, रमेश सुनवाणी, हरिचंद्र नंदनवार, नरेंद्र काळे, आनंदराव चोपकर, निर्मला सुनवाणी सहित आदी उपस्थित होते...  मंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले... भुजाडे यांनी आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post