महाराष्ट्र वेदभुमी

मापगांव ग्रामपंचायतीचे कर्मचारी हरेश्वर दामोदर राऊत यांचे आकस्मिक निधन,

 


परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.. 

सोगाव -अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी हरेश्वर दामोदर राऊत(वय ५०) यांचे मंगळवार दि.१ एप्रिल २०२५ रोजी रात्री आकस्मिक निधन झाले आहे, त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

           शांत, संयमी व मितभाषी स्वभाव असलेल्या हरेश्वर राऊत यांच्या पश्चात एक भाऊ, भावजय, एक पुतण्या, एक पुतणी व इतर मोठा परिवार आहे. ते मागील जवळपास २७ वर्षांपासून मापगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणून कार्यरत होते, त्यांच्या अकस्मात निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती... त्यांच्या पार्थिवाचे अंतिमसंस्कार बुधवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सोगाव येथील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात पार पडले, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंतिमसंस्कारावेळी तसेच त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शासकीय व इतर क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक तसेच पंचक्रोशीतील सर्व स्तरातील महिला, पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... त्यांचा दहावा विधी गुरुवार दि. १० एप्रिल रोजी होणार आहे तर तेरावे रविवार दि. १३ एप्रिल रोजी सोगाव येथील राहत्या घरी होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post