महाराष्ट्र वेदभुमी

न्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रम संपन्न

३६ व ३६अ चे शेरे कमी करुन शेतकऱ्यांना सातबारा विरहित करून देण्यात आले

प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा:  मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर निरनिराळ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे त्या अंतर्गत रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवड  यांच्या संकल्पनेतून मौजे न्हावे , सोनखार, नवखार व दीव येथील बिगर आदिवासी शेतकऱ्यांच्या अधिकार अभिलेखातील ३६ व ३६ अ चे  शेरे कमी करून शेतकऱ्यांना सातबारा वितरित करण्यात आले... तसेच जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत मयत खातेदारांची नावे कमी करण्यासाठी मार्गदर्शन  करण्यात आले त्याप्रमाणे उपस्थित ग्रामस्थांच्या निरनिराळ्या शंकांचे निरसन मा. उपविभागीय दंडाधिकारी यांनी आपल्या अभ्यासपूर्व मार्गदर्शनातून केले... त्याप्रमाणे रोहा तालुक्यातील कुंडलीका खाडी लगत दोन्हीकडे असणाऱ्या ग्रामपंचायतीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.. असे उपविभागीय दंडाधिकारी खुटवल यांने सूचीत केले आहे...

     सदर कार्यक्रमाकरिता महसूल नायब तहसीलदार रोहा पुंडलिक मोकल , चनेरा मंडळ अधिकारी प्रकाश मोकल , ग्राम महसूल अधिकारी नंदकुमार पाटील , कृष्णा बारड , रुपेश वाडकर , ग्राम विकास अधिकारी , न्हावे ग्रामपंचायत सरपंच नितीन डबीर व सदस्य , ग्राम पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते...

    प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक दिपक वारघे यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post