उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )२२ एप्रिल पहलगाम काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ हुन जास्त भारतीय व्यक्तींनी आपला प्राण गमावला.ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून या घटनेमुळे प्रत्येकाच्या मनात तीव्र वेदना आहेत.या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो...हे लक्ष्य डोळ्या समोर ठेऊन व दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी उरण वाल्मिकी समाजच्या वतीने उरण तालुक्यातील मोरा सिद्धार्थ नगर ते फणसवाडी (भवरा )पर्यंत कॅण्डल मार्च काढून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी प्रेमपाल वाल्मिकी, सुनिल पारचा, बंटी मुरारी,जॉगिंदर सिंह, सतीश वाल्मिकी,रवि गुहेर, हरपाल वाल्मिकी, मुरारी वाल्मिकी, सुरेश शर्मा, राहुल बैनवाल, बबली वाल्मिकी तसेच महिला पदाधिकारी - मंतोष वाल्मिकी, लंज्जा वाल्मिकी, माया वाल्मिकी, केशो वाल्मिकी, संगीता वाल्मिकी, माया पारचा, मंजुळा वाल्मिकी, सुरेखा वाल्मिकी, जागृती पारचा आदी वाल्मिकी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते...वाल्मिकी समाजने जड अंतःकरनाणे मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. व दहशतवाद्यांचा निषेध केला...