सोगाव -अब्दुल सोगावकर : सर्व सामान्य नागरिकांना सण, उत्सव साजरे करता यावे यासाठी नेहमीच काळजी घेणाऱ्या अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुस्लिम बांधवांना ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद निमित्त मिठाई, भेटवस्तू व गुलाबपुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या...
यावेळी सोगाव, मुशेत व इतर गावातील मुस्लिम बांधवांना घरोघरी जाऊन तत्सम वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यासाठी मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय भगत, माजी उपसरपंच वसीम कुर, शिवसेना)(शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, माजी सदस्य मजीद कुर, जगन्नाथ पाटील, अजित घरत, गितेश करळकर, प्रभाकर मोहिते, विश्वास थळे, माजी सदस्या स्नेहा रुत, मंगेश राऊत, रमेश थळे, उत्तम राऊत, सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर, दत्तात्रेय राऊत, मंगेश मापगावकर, मंगेश उकरूळकर, मंगेश सुतार, मनोज काठे, तेजस काठे, सुमेश थळे, राकेश करळकर, कल्पेश राऊत, वेदांत भगत, मनीष म्हात्रे, जितेंद्र करंजुकर, संतोष रुत, स्वप्नील थळे, महेश सावंत, शफी वाकनिस, प्रमोद थळे, मयूर मोरे आदी मापगाव पंचक्रोशीतील ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन : ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्ताने मिठाई, भेटवस्तू, गुलाबपुष्प वाटप करताना मान्यवर,
