सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेकः कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी अँड सायंस ( किट्स) रामटेकला दोन नविन अभ्यासक्रम - कॉम्प्युटर सायंस अण्ड इंजिनिअरींग (आर्टिफीशीयल इंटेलिजेंस अँड मशीन लर्निंग) आणि इलेक्ट्राॅनिक्स अँड कॉम्प्युटर सायंस या करीता प्रत्येकी ६० जागांची एआयसीटीई, नवी दिल्ली कडून शैक्षणीक वर्ष २०२५-२६ पासून मान्यता प्रदान करण्यात आली आहे... त्याशिवाय कॉम्प्युटर टेक्नोलॉजी अभ्यासक्रमाच्या ९० जागांवरुन १२० जागा वाढवून देण्यात आल्या आहेत... वरील अभ्यासक्रमां व्यतिरिक्त बी. टेक. सीव्हील इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग , इलेक्ट्राॅनिक्स अँड कम्यूनिकेशन इंजिनिअरींग, काॅम्पूटर टेक्नोलॉजी, इंफार्मेशन टेक्नालॉजी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग इत्यादी अभ्यासक्रम पूर्वीपासून सुरू आहेत. तसेच सिव्हील आणि मेकॉनिकल मध्ये एम. टेक व पीएचडी अभ्यासक्रम सुद्धा आहेत... अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी दिली... नविन कोर्सची मान्यता मिळाल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना बि.टेक करण्यास वाव मिळेल असी अपेक्षा संस्थेचे सचिव श्री व्ही. श्रीनिवासराव यांनी व्यक्त केली व प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले...
