महाराष्ट्र वेदभुमी

आरोग्यावर घाला – नाल्यात सांडपाण्याचा उगम? दुसरीकडे दिलेला "नोटीस" की "एन.ओ.सी.?"



माणगाव (नरेश पाटील) – वॉर्ड क्रमांक १६ मध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. किशोर डोंगरे ते वाले राव यांच्या घरांदरम्यानचा नाला, जो काही दिवसा पूर्वी वाहून आलेल्या सांड पाणी पूर्णपणे आठला होता मात्र आता पुन्हा याच नाल्यात गेली कैक दिवस सांडपाण्याच्या प्रचंड प्रवाहाने भरून वाहत आहे. परिसरात अस्वच्छतेचा विळखा, दुर्गंधी आणि मच्छरांचा सुळसुळाट यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे...

ही समस्या अपघाती नाही – ती पद्धतशीर बेफिकिरीची फळं आहे.  तर दुसरीकडे याच भागात काही अंतरावर एका तीन मजली इमारतीतून रोजच्या रोज सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचे समोर आले आहे. तक्रारींचे ढीग आहेत पण उपाय? शून्य. फोटो, व्हिडिओ, मौखिक आणि लेखी तक्रारी – सगळं न.पंचायत  प्रशासनाच्या दरवाजावर टाकलं गेलंय. पण कारवाईच्या नावाने ठिणगीही नाही...

नोटीस दिल्या गेल्या, पण त्या "खऱ्या" नोटिसा होत्या की ‘एन.ओ.सी. ?  हा प्रसन समोर उभी राहिल्याचे सवाल संतप्त नागरिक विचारू लागले आहेत...

दरम्यानाचा काळात रविवारी दि.२७ एप्रिल रोजी 2025 रोजी रणरणत्या उन्हात माजी नगराध्यक्ष व नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांनी स्वतः या इमारती ठिकाणी तिसऱ्यांदा पाहणी केली आणि डोळ्यादेखत सांडपाणी वाहतानाचा थरकाप उडवणारा प्रकार पाहिला... त्यांनी संबंधित इमारतीच्या मालकाला तातडीने बोलावून वस्तुस्थिती दाखवून दिली...

नगर प्रशासनाच्या या बेफिकीर भूमिकेवर आता गंभीर सवाल उपस्थित होत आहेत... ही केवळ गलथान कारभाराची बाब नसून, आरोग्याचा थेट घात आहे... या इमारतीवर तात्काळ कठोर आणि कायदेशीर कारवाई न झाल्यास, प्रशासनच या घाणेरड्या नगर पंचायतचा व्यवस्थेचा भाग असल्याचा आरोप टाळता येणार नाही...

फौजदारी कारवाई करा – अशी ठाम मागणी आता जनतेतून होत आहे...आरोग्य धोक्यात घालणाऱ्या इमारतीच्या मालकाला संरक्षण देणारे कोण? आणि प्रशासन नक्की कोणाच्या बाजूने उभं आहे?

Post a Comment

Previous Post Next Post