रामटेक-मौदा मार्गांवरील टी -पॉईंट परिसरातील घटना
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना दि.(८) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली... याप्रकरणी रामटेक पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... पोलीस स्टेशन हद्दीतील शितलवाडी टी पॉईंट ते मौदा मार्गावर मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास दोन दुचाकींची आमोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू झालातर, दोघे जखमी झाले...दीपक शंकर मेहरकुळे (वय ४५) रा. परसोडा (शितलवाडी) असे मृतकाचे नाव आहे... दीपक मेहरकुळे (एमएच ४० बी. ७६६५) हे मोटारसायकलने मौदा टी पाईंटकडून परसोडा येथे घरी जात होते... दरम्यान, नगरधनकडून येणाऱ्या एम. एच. ४० टी. ०२९६ क्रं. च्या मोटारसाकलस्वार हर्षल शिवशंकर कावळे (वय १९) रा. नगरधन याने मेहरकुळे यांच्या मोटारसायकलला देविकर हार्डवेअरसमोर धडक दिली... यात मेहरकुळे यांचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला तर, जखमी हर्षलवर उपचार सुरू आहे...दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, घटनास्थळी तीन व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले... मात्र, दोन जखमींची कुठलीही माहिती समोर आलेली नाही...
याप्रकरणी दिनेश शंकर मेहरकुळे यांच्या तोंडी तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी हर्षलविरूद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे...
