महाराष्ट्र वेदभुमी

माणगावमध्ये आढळल्या तीन बेवारस मोटारसायकल

 

ओळख पटविण्यासाठी माणगाव पोलिसांचे आवाहन

माणगाव :- (नरेश पाटील): माणगाव पोलिस ठाणे अंतर्गत तीन बेवारस मोटारसायकल आढळून आल्या असून माणगाव पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे...

   सविस्तर वृत्त असे की,  माणगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये तीन वाहन बेवारस स्थितीत मिळुन आलेले आहेत...  तरी सर्व नागरीकांना माणगाव पोलिसांनी  आवाहन केले की, ज्याची मोटार सायकल किंवा इतर वाहने चोरीस गेली असल्यास आपण माणगांव पोलीस ठाणे येवुन आपले वाहनाबाबत खात्री करावी व आपला मालकीहक्क सिध्द करुन आपले वाहन घेवुन जावे... अन्यथा सदरील बेवारस वाहनाची रितसर शासकीय नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल... लिलावानंतर कोणाचेही म्हणणे ऐकुण घेतले जाणार नाही... सदर बेवासर वाहनाचा नंबर १) ब्लॅक रंगाची जुनी प्लसर १५० सीसी नंबर नसलेली, चेसीस व इंजीन नंबर स्पष्ट दिसत नसेलली मोटार सायकल २) ब्लॅक रंगाची जुनी प्लसर १५० सीसी नंबर नसलेली, चेसीस व इंजीन नंबर स्पष्ट दिसत नसेलली मोटार सायकल ३) प्लॅटीना बजाज हिरव्या रंगाची एम.एच.०२ एफ.ओ. ३७२४ असा आहे...

Post a Comment

Previous Post Next Post