महाराष्ट्र वेदभुमी

मगरिंचा सूळ सुळाट पुन्हा वाढला स्थानिकांनमध्ये भीतीच वातावरण.

 


अंधारात मगर तर दिवसात काठावर निद्रिस्त असल्याचे चित्र

माणगाव :- (नरेश पाटील) एन उन्हाळ्यात खांदाड येतील तलाव भागात मगरिंचा सूळसुळाट मोठया प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे..  विशेष करून अंधार पडताच मगरी तलावाच्या काठावर येत असतात... तर पदाचारिंची ये जा अशावेळी अचानक तलावात उडी घेत स्थानिकाना आम्ही याठिकाणी आहोत असा सावधानतेचा जणू काही संदेशच आहे.. 

 दरम्यान ही बाब सायंकाळी उशिरा विशेष करुन काळोखाच्या वेळेत आठ ते साडे च्या दरम्यान नित्याचे बनलीय.. अशातच रविवारी  ०२ मार्चला  रात्री ८:५५ वाजता तीन मगरी वस्ती भागाच्या विरुद्ध दिशेने वालेराव निवास जवळ असलेल्या मोरी जवळ मोकळ्यापणाने अंधारात फिरत असल्याचा प्रकार एका युवकला त्या भागातून  काळोखात आपला निवासकडे जाताना दिसला.. व अचानक तीन ते चार मध्यम वर्गाच्या मगरी पाण्याच्या ढबक्यात उडी मारून गेल्या ..तर त्याच वेळेत आमचे प्रतिनिधी एका कामाच्या निमित्ताने तेथून जाताना सदर ठिकाणी काही युवक मोबाईलची टॉर्च लावून मगर पाहताना दिसले.. खुद्द आमच्या प्रतिनिधीनेही पाण्यात दोन मगर पाहिले... याच मोरीजवळ काठाचा भागात असलेल्या चिखल मातीत दिवसा निद्रिस्त असल्याचे दृश्य सर्रासपणे युवक दाखवत असतात.. मात्र मगरिचा रंग आणि चिकल मातीचा रंग सारखेच असल्याने उगड्या डोळ्यानेही समजत नाही... तर काही दिवसापूर्वी येथील एक तरुण काठावर एक मगर झोपले असल्याचे दाखवत होता. मात्र तो दिसत नव्हता.... माणसांच्या बोलण्याच्या आवाजाने मगरिने पाण्यात उडी मारली.. त्याचवेळी खात्री झाली की तलावात मगर आहेत. दरम्यान याच भागात एका तीन मजलीची इमारत आहे तर अनेक भटके कुत्रे  सतत बसलेली असतात.. रात्री ११:३० च्या वेळीं काठावर तसेच रस्त्यावर निर्मनुष्य वेळेत मगर फीरत असल्याचे पाहून कुत्रे भुकण्याचा नागरिकांना आवाज येत होता... दरम्यानाचा काळात गेल्यावर्षी फ़ॉरेस्ट खात्याने या भागात उत्तर तालावाच्या भागत हिरवा कापडाची जाळी बांधली होती जी आजही मजबूत आहे...यांनी त्या भागात मगर येण्याचे बंद झाले ..मात्र आत्ता पश्चिम भागात  मगरिंनी आपला मोर्चा वळवत त्या भागात अंधार पडताच बाहेर येऊन काठावर सूळसुळाट वाढला आहे तर माणगाव नगरपंचायत तसेच फ़ॉरेस्ट विभागाने यात लक्ष घालून सर्व मगरिंचे बंदोबस्त करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा एकादा दिवस पादचारी, ज्येष्ठ नागरिक अगर लहान मूल यांना धोखा नाकारू शकत नाही.. तसेच याबाबत प्रतिनिधी ने रात्री ०९ वाजता व्हाट्सअपद्वारे फ़ॉरेस्ट खात्याला तात्काळ माहिती रविवारी दी. ०२ मार्चला दिली ..तसेच लगेच या मेसेज ला दाद देत फ़ॉरेस्ट खात्यांनी सकाळी भेटी देणार म्हणून शेरा मारला...

Post a Comment

Previous Post Next Post