महाराष्ट्र वेदभुमी

गोवे गावची डॉ. प्रेमळ मुसळे ही मास्टर ऑफ सर्जरी डिग्री उच्च गुणांनी उत्तीर्ण


पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर)

     रोहा तालुक्यातील गोवे गावची सुकन्या डॉ. प्रेमळ सुरेश मुसळे हिने मास्टर ऑफ सर्जरी डिग्री सप्तश्रुंगी आयुर्वेद विद्यालय, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ,नाशिक येथे ही परीक्षा उच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाली असुन डॉ प्रेमळ मुसळे हिचे अभिनंदन करण्यात येत आहे...

     डॉ प्रेमळ सुरेश मुसळे ही लहानपणापासून फार हुशार असून आपली मुलगी डॉक्टर व्हावी ही तीच्या आई-वडिलांचे स्वप्न होते.तिच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी आकस्मित निधन झाले...परंतु त्या दुःखातून सावरत तीने केलेले मेहनत व जिद्द याच्या जीवावर ती मास्टर ऑफ सर्जरी ही परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण झाली.डॉ. प्रेमळ मुसळे ही गोवे गावातील भोई समाजातील मुलगी असुन फक्त भोई समाजाचाच नाही तर संपूर्ण गावाचा नाव रोशन केला आहे...

        या यशाबद्दल प्रेमळ मुसळे हिचे रायगड जिल्हा भोई समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य,कोलाड लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सागर सानप, अध्यक्ष डॉ. मंगेश सानप, डॉ. विनोद गांधी, डॉ. श्यामभाऊ लोखंडे, डॉ. माधव आग्री,नरेश बिरगावले, रविंद्र लोखंडे, गजानन बामणे, अलंकार खांडेकर, नंदकुमार कळमकर, राजेंद्र कप्पू, विठ्ठल सावळे, विश्वास निकम, दिलीप मोहिते, सर्व पदाधिकारी व सदस्य, समस्त गोवे ग्रामस्थ व महिला वर्ग, तरुण वर्ग यांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post