लॉजमधील अवैध धंद्यांमुळे 'रामनगरीचा 'रामटेक नावाला लागतोय काळिमा
परिसरातील काही लॉजमध्ये अवैध धंधांना उत
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- प्रभु श्रीरामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व दुरवर प्रसिद्ध असलेल्या रामनगरी म्हणजेच रामटेक शहराला परीसरातीलच काही लॉज चालकांकडून चालविण्यात येत असलेल्या अवैध धंद्यामुळे गालबोट लागत आहे... अवैध धंदे चालवित हेच काही लॉज चालक प्रख्यात रामनगरीची प्रतिमा मलीन करतांनाचे चित्र सध्या दिसुन येत आहे.
रामटेक परिसरात शंभराच्या वर लॉजेस आहेत. रामटेक हे तिर्थक्षेत्रासह पर्यटन स्थळ सुद्धा आहे... त्यामुळे येथे भाविक भक्तांसह पर्यटक तथा प्रेमीयुगुल सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात... गेल्या काही वर्षात प्रेमीयुगुलांचा कल रामटेकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ' कॉलेजसाठी निघायचं, फिरायच्या उद्देशाने रामटेकला यायचं अन् लॉजमध्ये ' शिरायचं असाच काहीसा प्रकार गेल्या काही वर्षांपासुन घडत आला आहे.. नेमकी हिच बाब हेरून स्थानिक काही लोकांनी लॉजेस उभारण्याचा जणु सपाटा लावला. परिणामस्वरूप बोटावर मोजण्याएवढ्या लॉजेसच्या संख्येत झपाट्याने वाढ होवुन ती आजघडीला दिडशेच्या घरात पोहोचली आहे... गेल्या तिन - चार वर्षापूर्वी लॉज च्या धंद्याला जणु सुगीचे दिवस आले होते. मात्र गेल्या एक दोन वर्षात रामटेक तालुक्याच्या सिमारेषेबाहेर मौदा, कन्हान, भंडारा तथा तुमसर मार्गावर नविन लॉजेस तयार झाल्यामुळे रामटेक परिसरातील काही लॉजचालकांवर तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार, विद्युत पुरवठा बिल, पाणि बिल आदींचा खर्चही निघणे कठीण झाले आहे... कुणाकुणाची तर बोयनी सुद्धा होत नाही... तेव्हा काही लॉजचालकांनी यावर आपली शक्कल लढवत कमाईचा ' शॉर्टकट ' पॅटर्न अवलंबीला. त्यात त्यांनी लॉजवर अवैध धंदे सुरु केले... दरवरून महिलांना बोलवुन येथे देहव्यापार सुरु केला... दिवसाचा अतोनात पैसा येणे सुरु झाला. एकाचे पाहुन दुसऱ्याने मग तिसऱ्याने असे करता करता अनेक लॉज चालकांनी हा अवैध धंदा सुरू केला... याचा पोलीस प्रशाषणाला सुगावा लागला आणि कारवाईचा सपाटा सुरु झाला. कारवाईमुळे अनेक लॉज चालकांचे धाबे दणाणले मात्र यात रामनगरीचीही प्रतीमा मलीन झाली ही येथे एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. तेव्हा अवैध धंदे करणाऱ्या अशा काही लॉज चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांतुन पुढे येत आहे...
अवैध धंदे करण्यापेक्षा रोजमजुरीवर जा - ठाणेदार शेटे
याबाबद रामटेक पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम शेटे यांना विचारणा केली असता ' लॉज चालकांचे लॉज चालत नसेल, आर्थिक समस्या निर्माण झाली असेल तर त्यांनी सरळ रोजमजुरीवर जावे, आजघडीला मजुर मिळणे कठीण झालेले आहे... कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहे... तेव्हा तेथे जावुन मेहनत करून पैसा कमवावा मात्र पैसे कमवण्याचा अवैध धंद्याच्या स्वरूपातील हा शॉर्टकट मार्ग वापरून नियम,कायदा तोडु नये ' असे स्पष्ट बोलतांना सांगितले...
