सांडपाण्यावर प्रतिबंध करणा-या प्रकल्पाची गरज
प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा: रोहा तालुक्यातील सव्वीस गांव पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने महिला भगिनींनी एकत्र येत रोहा तहसील कार्यालयावर आंदोलनाची हाक दिली आहे... शासनाने करोडोंचा निधी या सव्वीस गांव पाणी पुरवठा योजनेवर खर्च केला असुन देखील सदर निधी कुठे गेला असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे...
तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत स्थापन होऊन सुमारे चाळीस पन्नास वर्षे होत आहेत... बारामहीने वाहणाऱ्या कुंडलिकेच्या अस्तित्वामुळेच लक्ष्मीची पाऊले रोह्याकडे वळली. सहाजीकच येथील तरूण चाकरमानी न होता...
येथेच रोजगार उपलब्ध करेल आणि शक्यतो गांव सोडणार नाही. भविष्यात रोह्यातील लोकसंख्याही घटणार नाही ऊलट वाढेल याचा अंदाज असतांनाही प्रशासनाने ऊपलब्ध असलेल्या पाणी नियोजनासाठी कोणतीही उपाय योजना न केल्याने आज आसपासच्या गावातील लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे... कुंडलिका नदि संवर्धन हे केवळ पावसाळ्यात नदिचे पाणी गावात शिरू नये या करताच प्रयोजन होते असे सांगितले जात आहे... मात्र नदिचे मुळ अस्तित्व टिकवण्यासाठी कोणतेच प्रयत्न झालेले दिसत नाहीत उलट शहरातील घाण सांडपाणी नदि पात्रात सोडले जात आहे...
औद्योगीक वसाहतीने रसायनयुक्त रंगीत सांडपाणी लांब सोडवण्यासाठी थोडे तरी प्रयत्न केले आहेत का ? सांगण्याचा मुद्दा असा की कुंडलिका नदिवर पंप पाऊस होते... रोहे अष्टमी नगरपरिषद हद्दीतील लोक अनेकवर्षे विनाप्रक्रिया केलेले पाणी वापरत होते... अगदि आदरपुर्वक बिनधास्त पणे मग एवढे नदिचे शुद्ध अस्तित्व टिकवण्यासाठी का प्रयत्न केले गेले नाहीत?आतातर पूर्वीची मातीची असलेलेली गटारे सिमेंटने बांधण्यात आली आहेत त्यामुळे जसेच्या तसे मैलामिस्रीत सांडपाणी नदिचे अस्तित्व नष्ट करीत आहे... नगरपालिकेकडे स्लजविल्हेवाट प्रकल्प केवळ दाखवण्यासाठी नियोजनात आहे. कारण अशक्य गोष्ट तेव्हाच वाटते की नगरपालिकेकडे तशी जागाच ऊपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे... नदिच्याकीनारी असलेल्या गावांचे, उद्योगांचे सांडपाणीनदित सोडण्यास प्रतिबंधकरणारा प्रकल्प म्हणून हाती घेतला तर सव्वीसच काय ! सव्वीसशे गावांना पाणी पुरवठा होऊ शकेल... एवढे पाणी खाडीला वाहून जात आहे. या अगोदर जे झाले आहे त्याचे दुष्परिणामही वर्तमान लोकांना भोगावे लागत आहेत... पुढे आणखी भयावह परिस्थिती होऊ शकते. मध्यंतरी वाचनात आले होते की कुंडलिका नदिचे पाणी शेजारील तालुक्याला पुरवण्यात येणार आहेत म्हणे , ते तुम्ही गाजर दाखवा परंतु नदिचे अस्तित्व पुर्ववत करा आणि असे प्रकल्प राबवा नदि वाचवण्यासाठी यापूर्वीही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे...
या संदर्भात अनेक वेळा या माध्यमातून लिहिले आहे आणि शासनदरबारी लेखी पाठपुरावा केला आहे...
शासन लोकोप्रयोगी असे अनेक प्रकल्प हाती घेत असते तसाच प्रदुषणमुक्त नदी प्रकल्प, प्रकल्प म्हणून शासनाने हाती घ्यावा आणि पुढील अनेक वर्षांच्या तहानेची तरतूद करावी असे पत्र व्यवहार आमदार ( श्रीवर्धन - अलिबाग - पेण ) मतदार संघ व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके रोहा यांनी केली आहे...
