माणगाव :- (नरेश पाटील) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या 56 व्या वर्धापन दिना निमित्त गुजरात येथील लखपत किल्ला येथून सुरू झालेली श्री राममूर्ती असिस्टंट कमांडर यांचे नेतृत्वाखाली 50 सायकल स्वार यांची 'समृद्ध तट समृद्ध भारत' हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेली सायकल यात्रा माणगाव पोलीस ठाणे हद्दीत सकाळी 08.00 वाजता आगमन होऊन सदर यात्रेचे स्वागत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती बोराडे, मसपोनी श्रीमती लाड, वाहतूक शाखा यांनी केले, असून सायकल यात्रा 09.20 वाजता गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाली.
सदर वेळी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेल्या पाहायला मिळाले...
