सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळ, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी (सा. वनी.) आकाशझेप फाऊंडेशन, रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने २१ मार्चला विविध उपक्रमांतून सामाजिक वनीकरण रोपवाटिका नवेगाव खैरी येथे जागतिक वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निसर्गदुतांनी ‘मानवी जीवनात वनांचे महत्त्व’ या विषयावर आयोजित चर्चासत्र, रोपवाटिका व पेंच धरण परिसरातील झाडांची ओळख, निबंध स्पर्धा या उपक्रमांत उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने, प्रमुख पाहुणे व वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके आणि इको क्लबचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले...
कार्यक्रमाला वनपाल अनिल राठोड, वनरक्षक सूरज चोपडा, वनमजूर बाळकृष्ण ढोके, मनोहर शेंडे, गजानन ढोंगे हे प्रामुख्याने उपस्थित होते...
सेजल कळमकर, यश डायरे, प्रतीक्षा वारकर, सुहानी ढोंगे, अंजली कळमकर, आरुषी राऊत, समीक्षा कोरडे, सेजल राऊत, विकेश कोरचे, आयुष पंधराम, प्रिन्स गजभिये, अनिकेत परतेती, प्रमोद भलावी, आयुष शेंद्रे, पियुष उइके, चंद्रभान सहारे, दिलकस बोटरे, नैतिक वरठी, उज्वल खंडाते, सुजल पनवारे, स्वयम भागडकर, प्रणय उरणार, भावेश बगमारे, निकुंज सहारे, दर्शन बर्वे, आदित्य डायरे, सेजल कळमकर, आरुषी राऊत, अंजली कळमकर, अक्षरा कळमकर यांचेसह ४० विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे समस्त कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले...
