महाराष्ट्र वेदभुमी

चिल्हे येथील लोखंडे भावकीच्या कुलदैवताचा वर्धापनदिन

श्याम लोखंडे रोहा रायगड : रायगड रोहा तालुक्यातील आध्यात्मिक तथा धार्मिक परंपरेचा वारसा तसेच संत परंपरा लाभलेल्या चिल्हे येथे लोखंडे भावकीच्या कुलदैवताचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला...

सदरच्या या कार्यक्रमानिमित्ताने कुदैवतावर दुग्ध जलाभिषेक,सत्यनारायण महापूजा, प्रवचन,खांब पंचक्रोशीचे हरिपाठ, तद्नंतर हरीकीर्तन,भजन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी लोखंडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते..

स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाल बाबा वाजे, धोंडे बाबा कोल्हटकर, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खांब पंचक्रोशी तसेच पंचक्रोशीचे मूळ मार्गदर्शक लोखंडे परिवाराचे प्रेरणास्थ वैकुंठवासी नारायण महाराज लोखंडे यांच्या कृपाछत्राखाली चालत आलेला या उत्सव सोहळ्यानिमित्ताने प्रसंगी हभप सुधीर महाराज लोखंडे महाराज लोखंडे चिल्हे प्रवचन सेवा तर हभप राम महाराज सावंत मुठवली खुर्द यांची कीर्तनरूपी या ठिकाणी संपन्न झाली.

तर या धार्मिक तथा आध्यात्मिक लोखंडे भावकीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खांब पंचक्रोशीचे वैभव गुरुवर्य डॉ मारुती महाराज कोल्हटकर, खांब पंचक्रोशीचे उपाध्यक्ष हभप प्रकाश महाराज थिटे, ज्येष्ठ वारकरी मोरेश्वर महाराज मरवडे, विनेकरी देवजी महाराज मरवडे,खेळू मरवडे, रघुनाथ कोस्तेकर, मारुती खांडेकर सर,दिलीप मोहिते, युवा सामाजिक कार्यकर्ते सुनिल महाडिक, तसेच परिसरातील वारकरी संप्रदायाचे भक्त गण, सामाजिक शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर चिल्हे ग्रामस्थ व महिला मातांनी लोखंडे परिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व सदिच्या देत कार्यक्रमाचा लाभ घेतला...

तर आयोजित या कार्यक्रमात हभप राम महाराज सावंत यांनी कुलदेवता यावर मोलाचे मार्गदर्शन करत उपस्थितांना मंत्रमुघ केले...


Post a Comment

Previous Post Next Post