दारुडे मिळाल्यास कारवाई अटळ - ठाणेदार शेटे
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक -: चिमुकल्यांसह तरुणांसाठी क्रिकेटसह विविध खेळ खेळण्याचे, विविध क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे, विविध सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम तथा लोकांच्या मॉर्निंग तथा इव्हिनिंग वॉकसाठीचे एकमेव मैदान असलेल्या नेहरू मैदानावर गेल्या काही दिवसांपासुन दारुड्यांनी जणु उच्छाद मांडत तेथेच दारू ढोकसणे व तेथेच बॉटल्स फोडण्याचा प्रकार चालविला होता... यामुळे येथे खेळाडुंसह लोकांना जखमी होण्याचा धोका निर्माण झाला होता... तेव्हा हा गंभीर प्रकार देशोन्नतीने दि. २२ मार्च रोजी 'करोडोंचा खर्च दारुड्यांमुळे व्यर्थ' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते... वृत्त प्रकाशित होताच विशेषतः पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले व त्याच दिवसांपासुन नेहरू मैदानावर सायंकाळच्या सुमारास ठाणेदार आसाराम शेटे यांनी पोलीस गस्त सुरु केली असुन दारुडे मिळून आल्यास कारवाई अटळ असल्याचे सांगितले...
आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेत करोडो रुपयांच्या निधीची तरतूद करून नुकतेच हे नेहरू मैदान काही विशिष्ट बाबी दृष्टीपुढे ठेवुन सुसज्ज केलेले आहे असे असले तरी मात्र या नेहरू मैदानावर सुमारास दारुड्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे... येथे विशेषता सायंकाळच्या सुमारास आल्हाददायक वातावरणात दारुड्यांच्या मैफिली रंगत असून दारूच्या बॉटल्स ते इथेच फोडतात यामुळे येथे चिमुकल्याण सह तरुण खेळाडू व लोकांना जखमी होण्याची शक्यता बळावली आहे तेव्हा मैदानाच्या सुसजतेसाठी खर्च केलेला कोटींचा निधी व्यर्थ जाईल काय असा प्रश्न प्रामुख्याने येथे उपस्थित झालेला आहे... देशोन्नतीला वृत्त प्रकाशित होताच सोशल मिडीयासह शहरातील गल्लीबोळात तथा आजुबाजुच्या गावखेड्यात हा चर्चेचा विषय ठरला... उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांचे नेतृत्वात ठाणेदार आसाराम शेटे यांनी नेहरु मैदानावर हैदोस घालणाऱ्या 'त्या' दारुड्यांविरोधात शोध मोहीम सुरु केलेली असुन दारुडे मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याची चिन्हे दिसुन येत आहे...
पोलीसांची नेहरू मैदानावर गस्त सुरु
वृत्त पत्राची दखल घेऊन ठाणेदार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू मैदानात पोलिसांनी २२ मार्च पासून गस्त सुरु केली आहे, कारण मागील दोन आठवड्यात पासून गांजा पिणाऱ्यावर आणि विकण्यावर सुद्धा ८ केसेस केल्या आहेत त्यावेळेस गंजट्टी लोकंसुद्धा आम्ही त्या मैदानावर शोधत आहोत... नेहरु मैदानावर दारुड्यांकडून होत असलेला हा प्रकार योग्य नाही... पोलीस प्रशासनाकडून सायंकाळच्या सुमारास गस्त सुरु केली असुन असा घृणास्पद प्रकार करणारे दारुडे मैदानावर मिळून आल्यास कारवाई अटळ असल्याचे ठाणेदार आसाराम शेटे यांनी माहिती देतांना सांगीतले...
