सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- टाटा फाउंडेशन अंतर्गत बनियन ट्री फाउंडेशन, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी (वन्यजीव), राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळ, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी (सामा. वनी.), आकाशझेप फाऊंडेशन, रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने २३ मार्चला सुरेवानी पर्यटन संकुल येथे जागतिक हवामान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला... यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांचे मार्गदर्शनाखाली निसर्गदुतांनी यावेळी ‘हवामानातील बदलाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात सहभागी होऊन इको क्लबच्या निसर्गदुतांनी स्वमत व्यक्त केले... तसेच नागलवाडी वनपरिक्षेत्रात जंगल सफारीच्या माध्यमातून हवामानाच्या बदलांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके, बॅनियन ट्री फाउंडेशनचे शिक्षणाधिकारी अमेय परांजपे, जगदीश धारणे, इको क्लबचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मनोहर शेंडे नेश्वरी मोहनकर, अक्षरा राऊत, अंतरा मैंद, कीर्ती उईके, आरुषी गजभिये, संजीवनी सूर्यवंशी, कल्याणी मेंढेकर, आयुष पंधराम, दिलकश बोटरे, आयुष गुरभेले, हर्षु पिल्लारे, किंजल चव्हाण, दिव्या दाढे, सेजल राऊत, दर्शन बर्वे, चंद्रभान सहारे, प्रमोद भलावी, प्रीतम ढोरे, नैतिक वरठी, प्रणय उरणाल, सुजल पनवारे, प्रिन्स गजभिये, पीयूष उईके, स्वयम भागडकर, उज्वल खंडाते, अनिकेत परतेती, वैभव सहारे, निकुंज सहारे, आदित्य डायरे, यश डायरे, भावेश बगमारे, गोविंद चक्रवर्ती, हर्षल कुंभरे, दिव्या ईडपाची, करण नेवारे, नेहा इनवाते, गायत्री नेवारे, श्रावणी राऊत, श्रुती ईडपाची, अभिजीत राऊत यांचेसह इयत्ता ५ वी ते ९ वीच्या ४१ निसर्गदुतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला...
