महाराष्ट्र वेदभुमी

आश्चर्य ! आठलेला तलाव पुन्हा भरू लागले.

 


मगरमुक्त तलावात पुन्ह भीतीचा शंका.

माणगाव :- (नरेश पाटील) खांदाड येतील वर्दळ भागात तलाव सुदृश्य एक भाग गेली अनेक वर्ष आहे... या तलावाचा काही अंतरावर काळ नदीही आहे... तर पूर काळात हा तलाव भरून जाते तसेच या तलावात मगरिंचा वावर गेली दोन अडीच वर्ष पोषक वातावरणामुळे वास्तव्याचा बाब समोर आलीय.. या जागेत सध्या रणराणत्या उन्हामुळे तलावतील पाणी पूर्णपणे आठले होते व मगर ही नैसर्गिक रीतीने निघून गेली.  मात्र या तलावात आत्ता एन उन्हाळा हंगामात पुन्हा पाण्यानी भरू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे... तसेच मागारिंचाही पुनरावृत्ती धोका नाकारू शकत नाही.  दुसरीकडे परिसरातील नागरिकांना या तलावमध्ये पुन्हा पाणी भरत असल्याचे लक्षत येताच आश्चर्य व्यक्त करू लागले आणि या आठलेल्या तालावात परत कुठून पाणी येऊ लागले असे जोरदार चर्चा रंगू लागले...

 दरम्यान चोकशी होताच नाल्यातुन या तलाव सुदृश्य भागत पाणी येऊ लागल्याचे बाब समोर आली... हा नालाही सुखला असताना नाल्यातही आले.पाणी कुठून?   कोणीतरी या नाल्यात दुसरया नाल्याचे पाणी वळवल्यामुळे नाल्यात तसेच या तलावात पाणी आल्याने तलाव एन उन्हाळ्यात भरू लागल्याचे बाब समोर आली आहे...  

दरम्यान हा प्रकार कधीही झाला नाही.. तर यंदा घडल्यामुळे उन्हाळा काळात नाल्यात तसेच तलाव मध्ये पाणी भरले आहे... या बाबतची तक्रार येथील  नागरिक नगरसेवक तसेच न. पंचायतकडे करणार असल्याची बाब एकता मित्र मंडळचे प्रभारी अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी सांगितले.    सदर नाला तलावातील पाणी आणि रस्त्यावरील पावसाळा काळात थांबुन राहणारया पाण्याचा निचारा होण्यासाठी न.पं. मार्फत बांधण्यात आला होता मात्र उन्हाळ्यामध्ये अशी अवस्था  निदर्शनास आली तर पावसाळा काळात यंदाची परिस्थिती कशी असेल? तर पूर अटळ असे येथील नागरिक बोलू लागले आहे... 

दरम्यान शनिवारी दि. 23 मार्च रोजी या तलावात काही अंश पाणी राहिल्याने शेकडो मास्यांचे दर्शन तसेच सुमारे तीन तीन किलो वजनाचे असल्याचे स्पष्ट होताच काही लोक यात उतरून घमेलाच्या सहाय्याने पाणी काढून सर्व मासे पकडून घेऊन गेले होते.. मात्र रविवारी तसेच सोमवारी रोजी या पूर्ण आठलेल्या तलावात पुन्हा भरपूर पाणी आल्याने या तलावात परत पाणीच पाणी झाल्याचे दिसू लागले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post