महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव रास्त भाव क्र.०१ येथील वाटप समस्या बिकट.

माणगाव :- (नरेश पाटील) महिन्याचा अंतिम दोन दिवस रेशन वाटप होण्याचा नित्य प्रकार रास्त भाव क्र. ०१ येथील वाटप दुकानात होत असल्याने लाभार्थी यांना मानसिक त्रास तसेच मनस्ताप होत असल्याची घटना घडतेय... या बाबतची अधीक माहिती अशी की रास्त भाव क्र.०१ हा शहरातील भादव रस्ता गोदाम जवळील मौजे खांदाड, ता.माणगाव, जिल्हा रायगड येथील शासनमान्य रास्त भाव दुकानमार्फत गरीब जनतेस रेशन वाटप होत असते... मात्र गेली अनेक महिने रेशन वाटप महिन्याच्या शेवटच्या दोन दिवस शिल्लक असताना होत असल्याचा प्रकार नेहमीचाच बनलाय. पूर्वी रेशनचे वाटप बिपीएल कार्ड धारक यांना प्रथम धान्याची वाटप दि.१० ते १५तारखेच्या दरम्यान होत असते यानंतर केसरी, पिवळी कार्ड धारक लाभार्थी यांना दी. १६ ते २३ अगर २५ तारीखेच्या अगोदर वाटप करुन पूर्ण केले जात असे... मात्र सर्वांना एक किंबहुना दोन दिवस आणि ते ही महिन्याच्या फक्त दोन दिवस शिल्लक असताना रेशनची वाटप व असाच प्रकार गेली अनेक महिन्यापासून घडत आला आहे.. परिणामी लाभार्थी यांना आपल्याला रेशन मिळतो की नाही तसेच नवीन महिना सुरु झाला की आपल्याला या महिनाचा रेशन बुडतो की काय ? अशी धावपळ, मानसिक त्रास, तसेच मनस्ताप होत असल्याची घटना घडत आहे.. त्याचबरोबर अचानक  झुंबड आणी गर्दी होत असल्याने तासंतास तर अर्धा दिवस थांबवं लागत आहे... हा सर्व प्रकार दर महिना व अनेक कालापासुन सुरु असल्याने पुरवठा विभागात याबाबत कल्पकता आहे की नाही ? लाभार्थी आपला रेशन घेण्याच्या कामात व्यस्त असल्याने सहजासहजी तक्रार करण्याचा विचार करीत नाही मात्र होत असलेला मानसिक त्रास मूग गिळून गप्प असतात.. पुढील महिन्याचा रेशन प्राप्त होण्याचे कुठलीही अडचण होऊ नये अगर पुढील महिना आपल्याला रेशन वेळेत मिळेल याची आशा बाळगतो.. मात्र पुन्हा त्याच मानसिक त्रासाला सामोरे जात असतात. यासोबत रेशन वाटप करणारा व्यक्तीला फोन करणे, चकरा मारणे, चौकशी करणे, माहिती घेणे, लक्ष ठेवणे असे हाल सोसत कसाबशी येऊन रेशन घेऊन जातात...गेली अनेक वर्ष राशन वाटप करणारा व्यक्ती स्थिर नसल्यामुळेच हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी, २०२५ला सायंकाळी उशिरा आमचे जिल्हा प्रतिनिधी माणगाव तसेच शासन मान्यता रास्त भाव दुकान क्र.०१ येथील लाभर्ती यांच्या हाती लागला आहे... राशन वाटप सुरु झालं आहे काय? असा चौकशी केले असता समजले की मी नाही दुसरा व्यक्तीने वाटप सुरु केले आहे. तर तात्काळ रेशन घेण्यास गेले असता आमच्या प्रतिनिधी यांनी सदर रास्त भाव दुकानात वाटप करीत असलेल्याकडे विचारपूस केले असता त्यानी उत्तर दिले की आज महिनाचा शेवटचा दिवस आहे. लाभार्थीना धान्य वाटप करण्यास कोणीही नसल्याची बाब आम्हला समजली आहे तसेच मदतीचा भावना ठेवून वाटप करीत असल्याचे उत्तर त्यानी दिले...  

 दरम्यान पुढे असेही लोकांमधून समजले की पूर्वी वाटप करण्यारा होता तो तात्पुरती वाटप करत होता.. तर त्याच्या अगोदरही एका युवक काही महिने रेशन वाटपचे काम केल्याचे चित्र दिसत होते...  दरम्यानाच्या काळात रेशन वाटपची जागाही निश्चित नसल्याने राशन घेण्याची धावपळ होत असते...

       यादरम्याचा काळात दि. २८ रोजी सायंकाळी रास्त भाव दुकान क्र. ०१ येते ता.पुरवठा अधिकारी यांनी अचानकपणे भेट देऊन एकंदरी राशन वाटपची हाल पाहिले आणी खुद्द साहेबच आल्याची खबर मिळताच आमच्या प्रतिनिधी यांनी त्यांची भेट घेऊन व परिचय देऊन सदर रास्तभाव दुकानाचा पाढाच वाचला... साहेब यांनी हे सर्व शांतपणे ऐकून घेऊन तसेच रेशन घेण्याचे जे झुंबड चित्र स्वतः पाहिले नंतर आमच्या प्रतिनिधीकडे वार्तालाप करताना सांगितले की आता नोटीस काढणार आहे तसेच रास्तभाव धान्य वाटप जे कोण करतील त्यांच्याबरोबर एक करार करुन घेणार जेणेकरून असे परिस्थिती उद्भवणार नाही असे सांगितले. मात्र या उत्तरास आमचा प्रतिनिधीचे समाधान झाले नसल्याने त्यानी अधिकारी यांना निदर्शनास आणुन दिले की मूळ प्रश्न असे आहे की राशन वाटपचा मुद्दा जो प्रत्येक महिनाच्या दुसरा आठवडा बिपीएल कार्ड धारक, यानंतर तिसरा आठवड्यात पिवळी आणि केसरी कार्ड धारक यांना वाटप होत असते..हा पूर्वी वाटप होत असे मात्र आत्ता महिन्याचा शेवटचा दोन दिवस शिल्लक असतानाचे वाटप होत असते परिणामी सुमारे ६०० कार्ड धारक यांना धान्याचे वाटप कसे देणे शक्य ? शुक्रवारी सुमारे २१६  लाभार्थीना वाटप झाले.. संपूर्ण दिवस देऊन सुद्धा काळोखात वाटप चालू होते.. याला कारणच असे की लाभार्थी यांना धाकधुकी की आमचे या महिन्यातील रेशन बुडेल की  काय ? तर दुसरीकडे दुसरा दिवस असे समजले की मार्च ०१ रोजी शनिवारी रास्त भाव दुकानात धन्याचे वाटप दुकान बंद असल्याने वाटप होऊ शकले नाही... म्हणेजच ज्यांना फेब्रुवारी महिनाचे रेशन नाही मिळाले त्या लाभार्थ्यांना रेशन मिळेल की नाही ? तर पुरवठा अधिकारी यांनी सांगितले की मुळातच धान्य पुरवठा करणारा ठेकेदार पनवेल येथून थेट वाटप करणाऱ्याकडे देत परस्पर पोच करीत असल्याने ही बाब आम्हला माहीत नाही की कधी जमा केले आहे... तर याबाबत पुरवठा अधिकारी यांनी लक्ष घालून वेळतच धान्य पुरवठा मिळण्यासाठी पुढाकार घ्यावे.. तसेच असं प्रथमच झालय की खुद्द ता.पुरवठा अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन समस्याही जाणून घेतले तर त्यांचे कौतुक होतय.. आणी एकंदरीत समस्या स्वतः पाहिल्याने यापुढे आपल्याला वेळेत आणि निश्चित काळत धान्य मिळेल अशी अशा वाढल्याचे अनेक लाभार्थिकडून बोलल्याचे ऐकण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post