सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- वाघोली शिवकुंड येथे दोन दिवसीय आदिवासी भुमक महासभेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी शिवरात्री निमित्य येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे आज बुधवार व गुरुवारी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जेष्ठ भुमकांनी समाजाप्रती जागरूकता निर्माण केली...
गोंडी धर्म भूमक म्हणून येथे दिक्षा दिली जाते. देशभर्यात हे दिक्षा घेण्याचे एकमेव स्थान असल्याचे सांगण्यात येते. येथे दरवर्षी भुमक म्हणून ४० ते ५० नागरीक दिक्षा घेतात यावर्षी सुद्धा ५० पेक्षा जास्त आदिवासी बांधवांनी भुमक म्हणून दिक्षा घेतली...
यावेळी गोंडवानाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजे वासुदेवशाह टेकाम, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती दुर्गावती सरियाम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हरीष उईके, विजय कोकोडे, हरिश्चंद्र सरियाम, रामनाथ धुर्वे, सुरेश धुर्वे,सरपंच प्रविण उईके, आदी उपस्थीत होते. महाशिवरात्रीच्या निमित्याने आयोजीत कार्यक्रमात वाघोली (शिवकुंडी) येथुन बडादेवची पालखी यात्रा काढण्यात आली. पालखी यात्रा वाघोली ते पिपरिया येथून काढुन पिपरियात संपूर्ण गाव भ्रमंती करण्यात आली. यानिनित्याने येथे धार्मिक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. भाविकांसाठी फळहारी साहित्य वितरीत केले गेले. कार्यक्रमाला परीसरातील शेकडो भाविकांनी उपस्थीती दर्शवून दर्शनाचा लाभ घेतला...
