महाराष्ट्र वेदभुमी

'टेक्नोडीअन '२५, महोत्सवाचे ६ मार्चला शुभारंभ


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलाजी अँण्ड सायंस  (किट्स) रामटेक मध्ये विद्यार्थ्याच्या वतीने राष्ट्रिय स्तरावरील तांत्रिक व सांस्कृतीक युवा महोत्सव टेकनोडियन २५ चे ३ दिवसीय आयोजन ६ ते ८ मार्च २०२५ दरम्यान करण्यात आले आहे...

६ मार्चला सकाळी ११ वाजता महोत्सवाचे उद्घाटन एनसीसी नागपूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अंकुर भटनागर करतील.  तर कार्यक्रमाची अध्यक्षता वोडीथला शिक्षण संस्थाचे सचिव व्ही. श्रीनिवासराव करतील... यावेळी प्रामुख्याने प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे, विद्यार्थी डीन डॉ पंकज आष्टणकर, संयोजक डॉ संजयकुमार बोरिकर, विद्यार्थी प्रतिनिधी जुबेर सय्यद व विवेक एलकापेल्ली सहित मोठ्या संख्येत विद्यार्थीि उपस्थित राहतील...

या वेळी विविध स्पर्धा मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, पदक व रोख पुरस्कार देण्यात येईल. टेक्नोडीअन २५ मधे युवा संसद, राष्ट्रीय परिषद, पोष्टर सादरीकरण, खजाना शोधने ,कला महोत्सव, नौका स्पर्धा, इ-स्पोर्ट, धनुर्विद्या, हॅकथान, ओपन माईक, जुक बॉक्स आदि स्पर्धा होतील... ८ मार्चला दुपारी २.३०वाजता टेक महिंद्रा नागपूरचे उपाध्यक्ष आदित्य भाटिया यांचे हस्ते समापन होईल व सायंकाळी रंगारंग संगीत कार्यक्रम रागा अँण्ड रॉक्स सादर केल्या जाईल...

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किट्स चे सचिव श्री वी श्रीनिवास राव,श्री प्रणव व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात अधिष्ठाता, संयोजक,प्राध्यापक व विद्यार्थी सातत्याने प्रयत्नशील आहेत....

Post a Comment

Previous Post Next Post