जिवंत सातबारा मोहीम शेतकऱ्यांसाठी लाभदायक - तहसिलदार कोळपे
आता मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीचे अधिकार सहज मिळणार
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने राज्यभर 'जिवंत सातबारा मोहीम' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा उद्देश मयत खातेदारांची नावे सातबाऱ्यावरून काढून त्यांच्या वारसांची अधिकृत नोंदणी करणे आहे. मृत व्यक्तींच्या नोंदी शेतजमिनीच्या खरेदी-विक्री आणि कर्ज प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण करतात. त्यामुळे या उपक्रमामुळे कायदेशीर अडचणी कमी होऊन प्रक्रिया सुलभ होईल. ही मोहीम १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावात मयत खातेदारांची माहिती गोळा करून त्यांच्या वारसांची नोंदणी केली जाईल. यामुळे वारसांना शेतजमिनीच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये सोपे मार्गदर्शन मिळेल आणि शासकीय योजनांचा लाभ अधिक सहजता होईल. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना शेतजमीन, मालमत्ता आपल्या नावावर करताना अनेकवेळा अडचण जाते. आता मात्र मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी राज्य शासनाकडून 'जिवंत सातबारा' मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे सातबारावर त्वरित नोंद करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत, ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत, सातबारा उताऱ्यावर मृत खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. 'जिवंत सातबारा' मोहीम महसूल विभागाची पारदर्शकता वाढविणारी ठरणार आहे. यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येणार आहे. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद करण्यात येईल, अर्जदाराने अर्ज न करता महसूल यंत्रणा पुढाकार घेणार आहे. मृत व्यक्तींची नावे सातबाऱ्यावरून कमी करून वारसांची नोंद करण्यात येणार आहे..
जिल्हाधिकारी राहणार नियंत्रण अधिकारी
तहसीलदारांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे...
जिवंत सातबारा मोहीम’ कशी राबवली जाणार
➡️ १ ते ५ एप्रिल: तलाठी गावात जाहीर वाचन (चावडी वाचन) करून मयत खातेदारांची यादी तयार करतील.
➡️ ६ ते २० एप्रिल: वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करायचा.
➡️ २१ एप्रिल ते १० मे: तलाठी व मंडळ अधिकारी संबंधित फेरफार मंजूर करून सातबारा अद्ययावत करतील.
➡️ न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता, सर्व मयत खातेदारांच्या वारसांची नावे सातबाऱ्यावर येतील.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना महसूलने दिल्या सूचना
या मोहिमेबाबत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे.
त्यानंतर ही मोहीम राबविली जाईल.
राज्य शासनाने १९ मार्च २०२५रोजी यासंदर्भात निर्णय घेतला आहे... महाराष्ट्रात ही मोहीम १एप्रिल २०२५ पासून राबवण्याचा आदेश दिला आहे...
महसूल विभागातर्फे राज्यभर जिवंत सातबारा मोहीम सुरू केली जाणार आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - रमेश कोळपे, तहसीलदार, रामटेक