भोसला देवस्थान गडमंदिर रामटेक येथे भव्य स्वच्छता मोहिम
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- भोसला देवस्थान गडमंदिर रामटेक येथे उपविभागीय अधिकारी आणि गडमंदिराचे रिसीव्हर प्रियेश महाजन यांच्या हस्ते दि. २२ मार्च २०२५ सकाळी ७ ते ९ या वेळेत एक दिवसीय भव्य स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली... या मोहिमेत आनंदधाम, रामधाम, सृष्टीसौंदर्य परिवार, तहसील कार्यालय, नगर परिषद, आणि पंचायत समिती रामटेकचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते... यासोबत कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स), नरेंद्र तिडके कॉलेज, ताई गोलवलकर सायन्स कॉलेज, विद्यासागर कला महाविद्यालय, जनप्रभा महाविद्याल याच्या एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थ्यांचा सहभाग होता...
या महास्वच्छता मोहिमेत ४०० विद्यार्थी व कर्मचारी यानी सहभाग घेतला... ही माहिती उपविभागीय अधिकारी आणि गढमंदिराचे रिसीव्हर प्रियश महाजन यांनी दिली आहे... या सफाई अभियानमधे राम मंदिरापासून वराह मंदिरापर्यंत आणि पूर्वेकडील गड मंदिराच्या सुरक्षा भिंतीखाली स्वच्छता करण्यात आली... स्वच्छता मोहिमेत पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार रमेश कोळपे, आनंदधामचे लक्ष्मण मेहर, रामधामचे शिवकुमार, भागीणी मंडलच्या ज्योती कोल्हेपरा, नायब तहसीलदार मुकुंद भुरे, भोजराज, बडवाईक यांनी सहभाग घेतला... नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण सरकर, वैष्णवी हिंगेवार, सौरभ कावळे, नीलेश नरपाचे, शहर समन्वयक अपेक्षा नाहरकर, उद्धल हटवार, प्राचार्य शरद पोकळे, अनिल दाणी, ऋषी किमतकर, सुमित कोठारी, इत्यादी सहभागी झाले... स्वयंसेवकांसाठी सीतामाई रशोई येथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती...
