४० कार्यक्रमांचा सहभाग असून सुमारे १०० विद्यार्थ्यांनी घेतला भाग.
प्रतिनिधी - (सत्यप्रसाद आडाव चणेरा): रा.जि.प. केंद्रशाळा न्हावे - रोहा मराठी आयोजित विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा ठिकाण आळी न्हावे येथील भव्य पटांगणात मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ४० कार्यक्रमांचा सहभाग असून सुमारे १०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता... ४ लावण्या, ५ कोळीगीते , ८ लोकगीते, ६ रीमिक्स सॉंग, १ शेतकरी नृत्य, १ आदिवासी नृत्य, २ अभंग, २ मुक नाटीका (कचरा व्यवस्थापन व सर्वधर्मसमभाव) ४ विनोदी गीते आणि कोकणातील सुप्रसिद्ध असा बाल्याडान्स त्याचप्रमाणे १० इतर नृत्य विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादर केले...
प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत न्हावे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, न्हावे नवखार, सोनखार गाव अध्यक्ष, पोलीस पाटील, तिन्ही गावातील शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, सदस्य व सर्व शिक्षक उपस्थित होते...
एकंदरीतच तिन्ही गावच्या भरघोस उपस्थितीत हा भरगच्च कार्यक्रम अगदी उत्साहाने पार पडला. त्याच प्रमाणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्षांने विशेष मेहनत घेतली...
