महाराष्ट्र वेदभुमी

उन्हाळ्यातील पाणी प्रश्न मिटला


उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांच्या प्रयत्नांना यश

योजनेची किरकोळ दुरुस्ती तथा जोडणीच्या कामांना प्रारंभ

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- तालुक्यातील मनसर येथील मुख्यमंत्री पेयजल योजना ही बंद होती दरम्यान येथील नागरीकांना पाणिसमस्येचा सामना करावा लागत होता. ही बाब उदयसिंह उर्फ़ गज्जू यादव, महामंत्री, भाजपा नागपुर जिल्हा (ग्रामीण) यांच्या लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी दखल घेत ग्रामपंचायत मनसर येथिल मुख्यमंत्री पेयजल योजना तात्काळ सुरु करण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांना निवेदन या समस्येविषयीचे निवेदन त्यांचे लक्ष वेधले होते. फलस्वरूप मंत्री बावनकुळे यांनी संबंधितांना तात्काळ निर्देश देऊन समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिल्याने व आजपासुन कामही सुरु झाल्याने मनसर येथील मुख्यमंत्री पेयजल योजना सुरु होणार आहे. समस्येसाठी पुढाकार घेतल्याने गज्जु यादव यांचे सर्वस्तरातून कौतुक केल्या जात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व मुख्य अभियंता, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, नागपूर यांनी संबंधित सर्व विभागांची समिति तयार करून ग्रामपंचायत मनसर येथे भेट दिली तथा येथील सर्व तांत्रिक अडचणी समजून घेत यासंबंधी पंचायत समिति रामटेक येथे बैठक घेतली. त्यानुषंगाने काल दि. ४ मार्च ला ग्रामपंचायत मनसर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद नागपूर, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद नागपूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती रामटेक, अध्यक्ष शिखर समिती नगरधन पाणी पूरवठा ग्रामपंचायत मनसर व शीतलवाडी ग्रामविकास अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. तदनंतर पंचायत समिति, रामटेक येथे बैठक घेवून नळयोजना सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले. उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी केलेल्या सूचनेनुसार आज दि. ५ मार्चपासुन योजनेची किरकोळ दुरुस्ती जोडणी कामे सुरू करण्यात आली आहे. एका महिन्याच्या आत नळ योजना नियमित करून ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात येणार आहे. उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली नळ योजना त्यांच्याच हस्ते सुरु होणार असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. बैठकीला श्री कपिल कलोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्यासह सर्व विभागप्रमुख तसेच खैरी बिजेवाडा ग्रा.पं. सरपंच रणवीर यादव, नितेश डहरिया, बैजू खरे व सौ.कविता वाढीवे ग्रा.प सदस्य मनसर तथा सो. ज्योती यादव, सौ. पौर्णिमा भोयर, सौ. ममता पाटील आदी. उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post