महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई-गोवा महामार्गावर ५दिवसापासून वाहतूक कोंडी; चौपदरीकरणाचे अर्धवट काम,तिढा सुटता सुटेना?

कोलाड, इंदापूर, माणगावमध्ये चक्का जाम 

कोलाड (श्याम लोखंडे)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड, इंदापूर. माणगाव मध्ये  ५ ते ६ किलोमीटर अंतरावर गेली चार ते पाच दिवसापासून वाहनांच्या लांबच लांब लागल्या असुनं हा महामार्ग चक्का जाम झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे प्रवाशी वर्गाचा मोठा खोलंबा होत असल्याचे दिसून येत असुन कोलाड, इंदापूर, माणगाव,तसेच संपूर्ण रायगड पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले...

कोकणात होळीचा सण हा मोठया उत्सहात साजरा करण्यात येतो.होळी उत्सवाच्या निमित्ताने लाखोच्या संख्येनी चाकरमानी  बुधवार दि १२ पासून आपापल्या गावी निघाले तर काही जन होळी नंतर  पालखीसाठी गावाकडे निघाले आहेत तर काही जन शिवजयंती निमित्ताने ही असंख्य शिवप्रेमी रायगडावर निघाले आहेत... तर काही चाकरमानी होळी नंतर परतीच्या प्रवाशाला लागले आहेत यामुळे मुंबई-गोवा महामार्गांवर दोन्ही बाजूला वाहतुक कोंडी दिसून येत आहे...

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाचे काम गेली १८ वर्षांपासून सुरु असुन हे काम आद्यप ही अर्धवट स्थितीत आहे... या मार्गांवरील नागोठणे, कोलाड येथील  उड्डाण पुलाचे काम अर्धवट आहे तसेच इंदापूर माणगाव येथील बायपास रस्त्याचा प्रश्न ही अजून प्रलंबित आहे... याबरोबर रस्त्याचे काम ही अर्धवट स्थितीत आहे... तर काही ठिकाणी निस्कृष्ठ दर्जाचे रस्ते यामुळे याचा नाहक त्रास कोकणात येणाऱ्या असंख्य चाकरमानी यांना होत आहे...   

प्रतिक्रिया 

रायगड पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली असुन नागोठणे,वाकण,सुकेली,कोलाड, इंदापूर पासून महाड पर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे... पोलिसांच्या अथक प्रयत्नाने वाहतूक कोंडी सुरळीत केली जात आहे...परंतु यासाठी प्रवाशी वर्गाची साथ ही महत्वाची आहे कारण प्रवाशी वर्ग एकाच रस्त्यावरून तीन ते चार रांगा लावत असल्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास विलंब होत आहे...नितीन मोहिते सहाय्यक पोलिस निरीक्षक कोलाड

Post a Comment

Previous Post Next Post