महाराष्ट्र वेदभुमी

डागडुजी दुरुस्तीसाठीचा निधी जातो तरी कुठे?

 

पेंच डाव्या कालव्याची दुरावस्था, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

जागोजागी मोठ्या प्रमाणात उखडल्याने कालवा फुटण्याची शक्यता

उपविभागीय अभियंत्यांना पत्रकारांची एलर्जी

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- हजारो एकर शेतातील शेतपिक अवलंबुन असलेल्या पेंच डॅम च्या डाव्या कालव्याची सध्या मोठी दुरावस्था झालेली आहे. कालव्याचे दोन्ही बाजुचे सिमेंटीकरण जागोजागी उखडुन आतील माती दिसुन पडत आहे. अशावेळी अशा ठिकाणी कुठेही भले मोठे भगदाड पडुन मोठी पातळी असलेल्या कालव्याचे पाणी आजुबाजुच्या शेतात जर शिरले तर कित्येक एकर शेतातील शेतपिकांचे अतोनात नुकसान होईल यात शंका नाही. तेव्हा या कालव्याची वेळीच डागडुजी दुरुस्ती करावी असे या कालव्या नजीकच्या शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे...

पेंच डॅम मधुन विशेषतः दोन कालवे निघालेले आहे... एक कोराडी, नागपुर कडे गेलेला असुन त्याला उजवा कालवा तर दुसरा जांब कांद्री, मोहाडी तथा भंडारा कडे गेलेला असुन त्याला डावा कालवा संबोधल्या गेले आहे... पैकी डावा कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्यावर हजारो एकर शेतातील शेतपिक अवलंबुन आहे... हा धानसदृष पट्टा असल्याने येथे धानपिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असते आणि धानपिकाला मोठ्या प्रमाणात पाणि लागत असते... कालव्याच्या दुरुस्तीअभावी काही अडचण निर्माण झाल्यास व कालव्याद्वारे वेळेवर पाणि न मिळाल्यास या कालव्यावर अवलंबुन असलेल्या हजारो एकर शेतातील शेतपिकांचे मोठे नुकसान होवु शकते. तसेच कालव्याची जागोजागी उखडुन दयनीय अवस्था झाल्याने कुठे भगदाड पडल्यास कित्येक एकरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होईल यात दुमत नाही. विशेषतः मानापुर पासुन पुढे कांद्री, मोहाडी तथा भंडारा दिशेने हा कालवा ज्यास्तच उखडला आहे. मानापुर जवळ मोटघरे यांचे शेतालगत तर या कालव्याचा काही भागच ढासळला आहे. मात्र निद्रावस्थेत असल्यासारखे पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हा ढासळलेला भाग कदाचित दिसला नसावा असेच काहीसे वाटु लागले आहे. कालवा फुटुन शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान घडल्याची घटना घडल्यावरच या अधिकारी कर्मचाऱ्या निद्रा उघडेल काय असा प्रश्न येथे प्रामुख्याने उपस्थित होत आहे. एकंदरीत कालव्याची सध्याची स्थिती पहाता गेल्या कित्येक वर्षापासुन या कालव्याची साधी डागडुजी दुरुस्ती सुद्धा केली नसावी असेच काही दिसुन येत आहे...

डागडुजी दुरुस्तीसाठीचा निधी जातो तरी कुठे?

कालव्याच्या डागडुजी दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो हे सर्वश्रुत आहे... त्यातुन कालव्याच्या उखडलेल्या भागाची डागडुजी दुरुस्ती करण्यात येत असते... असे असले तरी मात्र सध्याघडीला या डाव्या कालव्याची स्थिती पहाली असता गेल्या कित्येक वर्षांपासुन या कालव्याची साधी डागडुजी दुरुस्ती सुद्धा केलीच नसावी असेच दिसुन येते. तेव्हा डागडुजी दुरुस्तीसाठी येणारा निधी जातो तरी कुठे ? असा सवाल शेतकरीवर्गात घुमजाव करीत आहे...

उपविभागीय अभियंत्यांना पत्रकारांची एलर्जी

याबाबद विचारणा करण्यासाठी नुकत्याच १७ फेब्रुवारीला रामटेक येथील उपविभागीय अभियंता पेंच पाटबंधारे उपविभाग कार्यालय गाठले असता येथील उपविभागीय अभियंता भोमले हे हजर नव्हते. तेव्हा त्यांना फोन लावला असता नेहमीसारखेच त्यांनी फोन उचलण्याचे औदार्य दाखविले नाही. तेव्हा येथील कार्यालय कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते थोड्या वेळाने येणार असल्याचे कळले. अर्धा पाऊन तास वाट बघीतल्यानंतर अभियंता भोमले कार्यालयात दाखल झाले. तेव्हा येथील एका कर्मचाऱ्याने भोमले यांच्या कक्षात जावुन ' पत्रकार भेटीसाठी आले आहे ' असे सांगितले असता ' नंतर नंतर ' असे उत्तर ऐकु आले. तेव्हा पत्रकार मंडळी येथील गौडबंगाल कारभार चव्हाट्यावर आणतील या भितीनेतर त्यांनी पत्रकारांशी भेट टाळली नाही ना असा प्रश्न येथे यावेळी उपस्थित झाला...

Post a Comment

Previous Post Next Post